Salman Khan: सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव समोर येताच सलमानच्या सुरक्षेत वाढ

पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणात (Sidhu Moose Wala Murder) गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं (Lawrence Bishnoi) नाव समोर येताच सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Salman Khan: सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव समोर येताच सलमानच्या सुरक्षेत वाढ
Lawrence Bishnoi and salman khanImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 12:51 PM

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आल्याचं समजतंय. त्याच्या वैयक्तिक सुरक्षेशिवाय पोलिसांनी सलमान खानच्या घराभोवतीही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणात (Sidhu Moose Wala Murder) गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं (Lawrence Bishnoi) नाव समोर येताच सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 2018 मध्ये लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगातूनच सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सलमानच्या काळवीट शिकार प्रकरणावरून त्यालाही धमकी दिली होती. ‘रेडी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याच्यावर हल्ला करण्याचा कट लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने आखला होता. आता गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणात लॉरेन्सचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव समोर आलं आहे. या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचीही चौकशी सुरू झाली आहे. लॉरेन्स बिश्नोई हा तोच गुंड आहे ज्याने 2018 मध्ये सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. अशा परिस्थितीत ही टोळी पुन्हा सक्रीय होत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सलमान खानच्या काळवीट शिकार प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईने जोधपूरमध्ये सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतरही त्याची सुरक्षा खूप वाढवण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?

पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईने दहशत माजवली आहे. तो सध्या तुरुंगात असला तरी तिथूनच तो दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात गुन्हेगारी विश्वातील आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतोय. लॉरेन्स हा पंजाबच्या फजिल्ला इथल्या अबोहर भागात राहणारा आहे. 2018 मध्ये त्याने जेव्हा सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली, तेव्हा तो देशभरात चर्चेत आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याच्या गँगशी संबंधित काही शूटरला अटक केली होती. लॉरेन्स कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या निवडणुकीत सहभागी झाला होता. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्याने विरोधकांवर गोळ्या झाडल्या होत्या. तेव्हापासून त्याच्या गुन्हेगारीला सुरुवात झाली. त्याच्याविरोधात 50 पेक्षा जास्त लोकांच्या हत्येचा आणि हत्या करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.

हे सुद्धा वाचा

प्राथमिक तपासानंतर असं बोललं जात आहे की सिद्धू मूसेवालाचा मृत्यूही गँगवारमुळे झाला असून तिहार जेलपासून कॅनडापर्यंत त्याचं कनेक्शन जोडलं गेलंय. तिहार तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने या हत्येचा कट रचला होता आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने तो अंमलात आणला होता. नि:शस्त्र आणि बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडलेल्या सिद्धूवर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.