R Madhavan: “हा नवा भारत आहे”; Cannes मध्ये आर. माधवनने केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूरसुद्धा या कान महोत्सवात सहभागी झाले. त्यांनी माधवनचा (R Madhavan) हा व्हिडिओ शेअर केला आहे.
अभिनेता आर. माधवन (R Madhavan) त्याच्या ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. या चित्रपटाविषयी 75व्या ‘कान चित्रपट महोत्सवा’त (Cannes Film Festival) बोलताना माधवनने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं कौतुक केलं. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूरसुद्धा या कान महोत्सवात सहभागी झाले. त्यांनी माधवनचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. पंतप्रधान मोदींचं डिजिटल अर्थव्यवस्थेचं व्हिजन हे अर्थशास्त्रज्ञांनी आपत्ती असल्याचं समजलं होतं, परंतु प्रत्यक्षात तसं झालं नाही, असं तो या व्हिडीओत म्हणतोय. शेतकऱ्यांना फोन वापरण्यासाठी शिक्षित करण्याची गरज नाही, असंही तो यावेळी म्हणाला.
“जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा कार्यकाळ सुरू केला तेव्हा त्यांनी मायक्रोइकॉनॉमी आणि डिजिटल चलन आणलं. जगभरात याची चर्चा झाली. ‘हे चालणार नाही. ही एक आपत्ती आहे’ असं अनेकजण म्हणाले होते. तुम्ही शेतकरी आणि लहान गावांतील अशिक्षित लोकांना एक छोटा फोन किंवा स्मार्टफोन हाताळायला आणि हिशेब कसा करायचा हे कसं शिकवणार, असा सवाल करण्यात आला होता. मायक्रोइकॉनॉमी ही भारतातील मोठी आपत्ती मानली जात होती. पण दोन वर्षांत ती संपूर्ण कथाच बदलली आणि भारत हा जगातील सर्वात मोठा मायक्रोइकॉनॉमी वापरणारा देश बनला आणि ते का घडले हे तुम्हालाही माहीत आहे. कारण फोन वापरण्यासाठी आणि त्यांनी कोणाला पैसे पाठवले, त्यांना कोणावरून पैसे आले हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी सुशिक्षित असण्याची गरज नव्हती. हा नवा भारत आहे,” असं माधवन म्हणाला.
पहा व्हिडीओ-
“We have extraordinary stories as far as science & tech. is concerned.
We have these guys from UP & MP who have started a new metaverse worth 15.3 billion as of today. These guys are actual heroes & are aspirations for the youngsters” – @ActorMadhavan at #Cannes #IndiaAtCannes pic.twitter.com/EwxTIkvqUH
— Office of Mr. Anurag Thakur (@Anurag_Office) May 19, 2022
आपल्या चित्रपटाविषयी बोलताना माधवन म्हणाला, “आर्यभट्ट ते सुंदर पिचाईपर्यंत, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत आमच्याकडे अशा अनेक विलक्षण कथा आहेत. आम्ही त्यांच्यावर चित्रपट बनवत नाही आहोत. ते जगभरातील तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत. एखाद्या अभिनेत्यापेक्षाही त्यांचे मोठे चाहते आहेत.”