KK Passes Away: “..तर कदाचित केके यांचे प्राण वाचू शकले असते”, डॉक्टरांनी दिली माहिती

कार्यक्रमादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. हॉटेलवर परतल्यानंतर त्यांना त्रास झाला आणि रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं.

KK Passes Away: ..तर कदाचित केके यांचे प्राण वाचू शकले असते, डॉक्टरांनी दिली माहिती
singer KK death mistryImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 3:05 PM

कोलकातामधल्या एका कॉलेज फेस्टिव्हलदरम्यान लाइव्ह परफॉर्म करताना प्रसिद्ध गायक केके (Singer KK) यांची प्रकृती बिघडली. कार्डिॲक अरेस्टने (Cardiac Arrest) त्यांचा मृत्यू झाला. कार्यक्रमादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. हॉटेलवर परतल्यानंतर त्यांना त्रास झाला आणि रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. केके यांच्या हृदयात ब्लॉकेजेस होते आणि वेळेवर सीपीआर (cardiopulmonary resuscitation) केला गेला असता तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते असं डॉक्टर म्हणाले. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी केके यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचं स्पष्ट केलं. केके यांना दीर्घकाळापासून हृदयासंबंधी समस्या होत्या, असं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

पीटीआयशी बोलताना डॉक्टर म्हणाले, “केके यांच्या डाव्या मुख्य कोरोनरी आर्टरीमध्ये मोठे ब्लॉकेज आणि इतर विविध धमन्या आणि उप-धमन्यांमध्ये लहान ब्लॉकेजेस होते. लाइव्ह शोदरम्यान अति उत्साहामुळे रक्तप्रवाह थांबला, ज्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या डाव्या मुख्य कोरोनरी आर्टरीमध्ये 80 टक्के ब्लॉकेज आणि इतर विविध धमन्या आणि उप-धमन्यांमध्ये लहान ब्लॉकेज होते. यापैकी कोणतेही ब्लॉकेड्स 100 टक्के नव्हते.”

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

“लाइव्ह परफॉर्म करताना ते उत्साहात नाचत होते. याच अतिउत्साहामुळे रक्तप्रवाह थांबला आणि हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर केके बेशुद्ध पडले. जर तातडीने त्यांना सीपीआर दिला असता तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते,” असंही ते पुढे म्हणाले.

सीपीआर म्हणजे काय?

सीपीआरचा लाँगफॉर्म कार्डिओपल्मनरी रेसॅसिटेशन असा आहे. आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीमध्ये तातडीचे उपचार म्हणून सीपीआरचा वापर केला जातो. यामुळे हार्ट अटॅक आलेल्या किंवा श्वास कोंडलेल्या एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो. कार्डिॲक अरेस्टमुळे व्यक्तीचा श्वास कोंडला जातो. त्यांना व्यवस्थित श्वास घेता येत नाही. अशा वेळी त्या व्यक्तीला कृत्रिम ऑक्सिजनची गरज असते. मात्र परिस्थितीनुसार प्रत्येक वेळी तातडीने वैद्यकीय मदत मिळेलच याची शाश्वती नसते. अशा वेळी सीपीआर देणं उपयुक्त ठरतो.

बुधवारी रात्री केके यांच्या पार्थिवाला मुंबईत आणलं गेलं. मुंबईतील वर्सोवा इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. फिल्म आणि म्युझिक इंडस्ट्रीतील अनेक कलाकार त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.