BR Chopra: बी. आर. चोप्रा यांचा जुहूमधील बंगला सुनेनं विकला; तब्बल इतक्या कोटींची झाली डील

22 एप्रिल 1914 रोजी बलदेव राज चोप्रा यांचा जन्म झाला होता. चित्रपटांमध्ये सुरुवातीपासून आवड असल्याने त्यांनी आधी चित्रपट पत्रकार म्हणून कामाला सुरू झाली. फाळणीनंतर ते आधी दिल्ली आणि नंतर मुंबईला आले.

BR Chopra: बी. आर. चोप्रा यांचा जुहूमधील बंगला सुनेनं विकला; तब्बल इतक्या कोटींची झाली डील
BR ChopraImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 5:39 PM

प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक बी. आर. चोप्रा (BR Chopra) यांचं मुंबईतील जुहू (Juhu) इथलं घर विकण्यात आलं आहे. त्यांचा हा बंगला तब्बल 183 कोटी रुपयांना विकला गेला आहे. जुहू हा मुंबईतील (Mumbai) अत्यंत पॉश परिसर मानला जातो. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी जुहूमध्ये राहतात. 2008 मध्ये बी. आर. चोप्रा यांचं मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. ‘धूल का फूल’, ‘वक्त’, ‘नया दौर’, ‘कानून’, ‘हमराज’, ‘इन्साफ का तराजू’ आणि ‘निकाह’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकत त्यावरून ऑफबीट कथा चित्रपटाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी ते ओळखले जात.

‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांचा हा बंगला 25 हजार चौरस फुटांवर पसरलेला आहे. के. रहेजा कॉर्पोरेशनने 182.76 कोटी रुपयांना हा बंगला विकत घेतला आहे. तर नोंदणीसाठी कंपनीने 11 कोटी मुद्रांक शुल्क भरले. के रहेजा कॉर्पोरेशनने बी. आर. चोप्रा यांची सून आणि दिवंगत चित्रपट निर्माते रवी चोप्रा यांच्या पत्नी रेणू चोप्रा यांच्याकडून ही मालमत्ता विकत घेतली. त्याठिकाणी एक प्रीमियम निवासी प्रकल्प उभारण्याची योजना प्रकल्प विकासक आखत आहेत. हा बंगला सी प्रिन्सेस हॉटेलच्या समोर आहे आणि तिथूनच बी. आर. चोप्रा हे त्यांचा व्यवसाय करत होते.

22 एप्रिल 1914 रोजी बलदेव राज चोप्रा यांचा जन्म झाला होता. चित्रपटांमध्ये सुरुवातीपासून आवड असल्याने त्यांनी आधी चित्रपट पत्रकार म्हणून कामाला सुरू झाली. फाळणीनंतर ते आधी दिल्ली आणि नंतर मुंबईला आले. सिने हेराल्ड जर्नलसाठी चित्रपट समीक्षा लिहून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 1949 मध्ये त्यांनी ‘करवट’ हा पहिला चित्रपट तयार केला, जो दुर्दैवाने फ्लॉप ठरला. 1951 मध्ये त्यांनी ‘अफसाना’ या चित्रपटातून निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून पुन्हा नशीब आजमावलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मेगा हिट ठरला. 1955 मध्ये त्यांनी स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस बी. आर. फिल्म्स स्थापन केलं. या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत आलेला त्यांचा पहिला चित्रपट ‘नया दौर’ हा अत्यंत यशस्वी ठरला.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.