Nawazuddin Siddiqui | अखेर नवाजुद्दीन सिद्दीकी याने केली आपली ‘ही’ मोठी आणि गंभीर चूक मान्य, अभिनेता थेट म्हणाला
बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपूर्वीच त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत होता.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याच्या पर्सनल आयुष्यामध्ये काही दिवसांपूर्वीच मोठे वादळ आल्याचे बघायला मिळाले. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर त्याची एक्स पत्नी आलिया सिद्दीकी हिने अत्यंत गंभीर आरोप लावले. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनंतर सर्वचजण हैराण झाले. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या एक्स पत्नीमधील वाद अगोदर थेट पोलिस ठाण्यात पोहचला आणि मग कोर्टात. यावेळी आलिया ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत गंभीर आरोप (Serious charges) करताना दिसली.
यावर फार काही भाष्य हे नवाजुद्दीन सिद्दीकीकडून करण्यात नाही आले. नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी त्याच्यावर आरोप करत असतानाच त्याच्या दुबईतील घरात काम करणाऱ्या एक कामगार महिलेने देखील आरोप केले. मात्र, काही दिवसांमध्येच आपण हे सर्व आरोप आलिया मॅडमच्या सांगण्यावरून केल्याचा दावा त्या महिलेने केला.
नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या चित्रपटांपेक्षाही अधिक त्याच्या लाईफमुळे चर्चेत होता. आता कुठेतरी नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या आयुष्यामध्ये आलेले हे वादळ थांबल्याचे बघायला मिळाले. नुकताच आता नवाजुद्दीन सिद्दीकी याने मोठा खुलासा करत आपण केलेल्या ज्या काही चुका आहेत, त्याने मान्य केल्या आहेत.
नवाजुद्दीन सिद्दीकी याचा आगामी चित्रपट सेक्शन 108 चा टीझर नुकताच रिलीज झालाय. यावेळी मोठा खुलासा करताना नवाजुद्दीन सिद्दीकी दिसला. नवाजुद्दीन सिद्दीकी हा म्हणाला की, मागच्या काही दिवसांमध्ये माझ्याकडून मोठ्या चुका झाल्या आहेत. मात्र, आता मी माझ्याकडून झालेल्या त्या सर्व चुका सुधारणार आहे. मी गेल्या काही दिवसांमध्ये काही चुकीच्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
आता हे मी परत करणार नाहीये. कोणत्याही चित्रपटाची संपूर्ण स्क्रीप्ट वाचल्याशिवाय निर्णय घेणार नाहीये. मी आता ठरवले आहे की, फक्त आणि फक्त चांगल्याच चित्रपटांमध्ये काम करायचे आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याचे रिलीज झालेले चित्रपट त्याच्या चाहत्यांना आवडले नाहीत. यामुळेच आता नवाजुद्दीन सिद्दीकी याने आपली चूक मान्य करत येणाऱ्या काळात चांगल्याच चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी याने आपल्या करिअरमध्ये खूप मोठा संघर्ष हा केला आहे. काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकी याची एक्स पत्नी त्याच्यावर आरोप करताना दिसली. नवाजुद्दीन सिद्दीकी याने आपल्याला मध्यरात्री घरातून मुलांसोबत बाहेर काढल्याचा दावा देखील आलिया हिने केला होता, याचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर देखील शेअर केला.