UP Bypoll Result 2023 : आजम खान यांच्या बालेकिल्ल्यात समाजवादी पार्टीला मोठा झटका
UP Bypoll Result 2023 : रामपूर हा आजम खान यांचा बालेकिल्ला समजला जातो. मुलगा अब्दुल्ला आजम याची आमदारकी गेल्यानंतर तिथे पोटनिवडणूक झाली.
रामपूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसह देशभरात पोटनिवडणुका झाल्या होत्या. या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होतायत, उत्तर प्रदेशात विधानसभेच्या दोन जागांवर पोटनिवडणूक झाली. उत्तर प्रदेशात स्वार टांडा सीट रामपूर जिल्ह्यामध्ये येते. स्वार सीटवर सहा उमेदवार मैदानात होते. स्वारमधून सपाने अनुराधा चौहान आणि अपना दलने शफीक अहमद अन्सारी यांना उमेदवारी दिली होती.
स्वार विधानसभेच्या जागेवर अपना दलने विजय मिळवलाय. इथे अपना दलचे उमदेवार आघाडीवर होते. शफीक अहमद अन्सारी यांनी समाजवादी पार्टीच्या उमेदवाराचा पराभव करुन विजय मिळवलाय. नव्या आमदाराची निवड करण्यासाठी निवडणूक झाली. यात समाजवादी पार्टीच्या अनुराधा चौधरी यांचा पराभव झालाय. याची अधिकृत घोषणा होणं अजून बाकी आहे.
स्वार विधानसभा पोटनिवडणूक अपडेट
स्वार विधानसभा पोटनिवडणुकीत अपना दलचा विजय झालाय. अपना दलचे शफीक अन्सारी पोटनिवडणुकीत जिंकले. स्वार विधानसभा पोटनिवडणूक अपडेट –
अपना दल – शफीक अहमद अंसारी – 50672 वोट समाजवादी पार्टी – अनुराधा चौहान – 45419 वोट रामपूर हा समाजवादी पार्टीचे नेते आजम खान यांचा बालेकिल्ला मानला जातो. स्वारची सीट आजम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आजम याची आमदारकी गेल्यानंतर रिकामी झाली होती.
कुठल्या पदांसाठी झालं मतदान
उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 17 महापौर, 1420 नगरसेवक, नगर परिषदांचे 199 अध्यक्ष, नगर पालिका परिषदांचे 5327 सदस्य, नगर पंचायतीचे 544 अध्यक्ष आणि नगर पंचायतीच्या 7178 सदस्यांच्या निवडीसाठी दोन टप्प्यात मतदान झालं होतं. निवडणुकीत 17 महापौर, 1401 नगरसेवक निवडीसाठी मतदान झालं. 19 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली. उत्तर प्रदेशातील 75 जिल्ह्यांमध्ये दोन टप्प्यात 4 मे आणि 11 मे रोजी मतदान झालं होतं.