सिद्धू, चन्नी, कॅप्टन यांना पराभवाची धूळ चारणाऱ्या AAP आमदारांना कॅबिनेटमध्ये स्थान नाही!
Punjab Bhagwant Mann Cabinet : आपनं पंजाबच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दणदणीत कामगिरी करुन दाखवली होती. आपचे 92 उमेदवार पंजाबमध्ये निवडून आले.
पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या मंत्रिमंडळात नेमकी कुणाकुणाला संधी मिळते, याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून लागली होती. अखेर पंजाबच्या नव्या कॅबिनेटची घोषणा झाली. सोमवारी खातेवाटप पार पडलं. या खातेवाटपात मुख्यमंत्र्यांनी गृह खातं स्वतःकडे राखून ठेवलं आहे. दरम्यान, अर्थखातं हे हरपाल चीम यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. हरपाम मानू पंजाबचं बजेट सादर करताना यापुढे दिसून येतील. दरम्यान, महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या शिक्षण खात्याची धुरा ही मीत हायर यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. तर डॉ. विजय सिंघला यांच्याकडे आरोग्य खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पंजाबमधील आप सरकारच्या (AAP) कॅबिनेटचं नेतृत्त्व करणार असून या कॅबिनेटमध्ये एका महिलेसह दहा आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. मात्र आपच्या ज्या उमेदवारांनी पंजाबमध्ये दिग्गज राजकीय नेत्यांना धूळ चारली, त्यांना मंत्रिपद दिलं जाणार की नाही, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, आता भगवंत मान यांच्या संपूर्ण कॅबिनेटचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम लागला असला, तरिही नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
दिग्गजांना हरवणाऱ्यांना ढेंगा?
काँग्रेसचे चरणजीत सिंह नच्ची, नवज्योत सिंह सिद्धू आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रकाश सिंह बादल, सुखबीर सिंह बादल तसंच अमरिंदर सिंह यांना पराभवाची धूळ चारणाऱ्या आपच्या आमदारांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. आपनं पंजाबच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दणदणीत कामगिरी करुन दाखवली होती. आपचे 92 उमेदवार पंजाबमध्ये निवडून आले. यामुळे काँग्रेससह अकली दलालाही मोठा धक्का बसला होता. दरम्यान, दिग्गजांचा पराभव करणाऱ्या आमदारांना मंत्रिपद मात्र मिळू शकलेलं नाही.
- कुणाकडे कोणतं मंत्रिपद?
- भगवंत मान – मुख्यमंत्री, पंजाब राज्य आणि पंजाबचे गृहमंत्री
- हरपाल चीमा – अर्थमंत्री
- मीत हायर – शिक्षणमंत्री
- डॉ. विजय सिंघला – आरोग्यमंत्री
- हरजोस बैंस – कायदामंत्री, पर्यटन मंत्री
- डॉ. बलजीत कौर – महिला बालविकास मंत्री
- हरभजन सिंह – वीज मंत्री
- कुलदीप सिंह धालीवाल – ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री
- लालजीत सिंह भुल्लर – परिवहन मंत्री
- ब्रम्ह शंकर – पाणीपुरवठा मंत्री आणि आपत्तीव्यवस्थापन
शनिवारी आपच्या दहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात हरपाल सिंह चीमा, हरभजन सिंह, डॉ. विजय सिंगला, लाल चंद, गुरमीत सिंह मीत हेयर, कुलदीप सिंह धालीवाल, लालजीत सिंह भुल्लर, ब्रह्म शंकर, हरजोत सिंह बैस आणि डॉ. बलजीत कौर यांनीही शपथ घेतली.
संबंधित बातम्या :
काँग्रेसचं राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदही धोक्यात?; काय आहे नेमकं गणित?
‘बाळासाहेब सोनियांची लाचारी करणाऱ्यांना XXX म्हणत’, अनिल बोंडेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका