Goa Government Formation: गोव्याचे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला, अमित शहांच्या घरी बैठक, विश्वजीत राणेंचं काय होणार?
निवडणूक निकाल लागून दहा दिवस झाल्यावर अखेर गोव्यात भाजपला सरकार स्थापनेचा मुहूर्त सापडला आहे. येत्या बुधवार किंवा गुरुवारी गोव्यात नवं सरकार अस्तित्वात येणार आहे. येत्या 23 किंवा 24 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांसह 11 मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
पणजी: निवडणूक निकाल लागून दहा दिवस झाल्यावर अखेर गोव्यात भाजपला (bjp) सरकार स्थापनेचा मुहूर्त सापडला आहे. येत्या बुधवार किंवा गुरुवारी गोव्यात नवं सरकार (Goa Government) अस्तित्वात येणार आहे. येत्या 23 किंवा 24 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांसह 11 मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पुन्हा एकदा प्रमोद सावंत (pramod sawant) यांच्याच गळ्यात पडणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर रात्री उशिरापर्यंत दिल्लीत खलबते झाले. त्यानंतर सरकार स्थापनेची तारीख ठरवण्यात आली आहे. 23 तारखेला केंद्रीय निरीक्षक नरेंद्र सिंग तोमर आणि एलय मुरूगन गोव्यात येणार आहेत. यावेळी विधिमंडळ गटनेता निवडीची प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे.
गोव्यात भाजपला पहिल्यांदाच 20 आमदारांचे स्पष्ट बहुमत मिळाल्याने गोमंतक जनतेच्या साक्षीने शपथविधी सोहळा करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. अपक्ष आमदारांसह महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षालाही यावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Thank you Shri @ianuragthakur ji for your warm wishes. https://t.co/QHWw1ZskE4
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) March 19, 2022
अपक्षांचा पाठिंबा
गोव्यातील एकूण 50 जागांपैकी बहुमताला 21 जागांची आवश्यकता आहे. भाजपने 20 जागा जिंकल्या आहेत. अपक्ष आमदार चंद्रकांत शेट्ये, एलेक्सियो रेजिनाल्डो लॉरेंसो आणि एंटोनियो वास यांनी आधीच भाजपला समर्थन दिलेलं आहे. तसेच एमजीपीचे आमदार रामकृष्ण ढवळीकर आणि जीत अरोलकर यांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपकडे बहुमतापेक्षाही अधिकचं संख्याबळ आहे. मात्र, भाजपला पाठिंबा देणाऱ्या कुणाकुणाला भाजप मंत्रिमंडळात स्थान देणार हे बुधवारी किंवा गुरुवारीच स्पष्ट होणार आहे.
संबंधित बातम्या:
पुन्हा योगी विराजमान होण्याची तारीख ठरली, शपथविधीचा प्लॅन काय? वाचा सविस्तर