Daily Static GK Quiz : आंब्याचं शहर कोणत्या शहराला म्हटलं जातं ?

कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करताना सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले जात असतात. त्यासाठी आपल्या देशातील कोणते राज्य आणि शहर कशासाठी प्रसिद्ध आहे असे प्रश्न हमखास विचारले जात असतात. पाहूया काही सोपे परंतू सहज उत्तर न येणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे

Daily Static GK Quiz : आंब्याचं शहर कोणत्या शहराला म्हटलं जातं ?
mango_Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 26, 2023 | 1:23 PM

नवी दिल्ली | 26 जुलै 2023 :  देशभरातील अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये स्टेटीक जीके प्रश्न विचारले जातात. मग ती परीक्षा कोणतीही असो एमपीएसीची किंवा युपीएससीची असो त्यामध्ये असे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे अशा परीक्षांची तयारी करताना देशातील कोणत्या प्रातांत काय पिकते हे जाणणे महत्वाचे आहे. जर तुम्ही कोणत्याही सरकारी नोकरीसाठी परीक्षेची तयारी करीत असाल तर तुम्ही या प्रश्नाची तयारी करायला हवी. तर पाहुयात कोणते प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात.

प्रश्न क्रमांक 1 – भारतात सर्वात जादा जंगल कोणत्या राज्यात आहे ?

क ) मणिपूर

ख ) अरुणाचल

ग ) कर्नाटक

घ ) मध्यप्रदेश

उत्तर 1 – ( घ ) मध्य प्रदेश

– भारतात सर्वात जास्त जंगल आपल्या शेजारच्या मध्य प्रदेशात आहे. मध्य प्रदेशाचे एकूण क्षेत्रफळ 308252 वर्ग किलोमीटर आहे. त्यापैकी सुमारे 77,462 वर्ग किलोमीटर क्षेत्रफळात जंगल पसरले आहे. देशातील एकूण जंगल क्षेत्राची तुलना करता 30 टक्के जंगलाचा भाग एकट्या मध्यप्रदेशात आहे.

प्रश्न 2 – स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या काचेच्या भांड्यांसाठी कोणत्या प्रकारची काच वापरली जाते.

क) फ्लिंट ग्लास

ख ) पायरेक्स ग्लास

ग ) क्रुक ग्लास

घ ) सोडा ग्लास

उत्तर  2 – ख ) पायरेक्स ग्लास

– स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या काचेच्या भांड्यासाठी पायरेक्स ( PYREX GLASS ) काचेचा वापर केला जात असतो.

प्रश्न 3 – भारतात सर्वाधिक रेशमाचे ( SILK ) उत्पादन कोणत्या राज्यात होते ?

क ) कर्नाटक

ख ) ओडीशा

ग ) उत्तर प्रदेश

घ ) पश्चिम बंगाल

उत्तर 3 – क ) कर्नाटक

– कर्नाटक राज्यात देशात सर्वाधिक रेशमाचे उत्पादन होते. येथे वार्षिक सरासरी 8,200 मेट्रीक टन रेशमचे उत्पादन होत असते. देशातील एकूण रेशीम उत्पादनापैकी एकट्या कर्नाटकात एक तृतीयांश उत्पादन होत असते.

प्रश्न – 4 कोणत्या भारतीय क्रिकेटरने सर्वात आधी कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले होते.?

क ) रवी शास्री

ख ) सुनील गावस्कर

ग ) कपिल देव

घ ) लाला अमरनाथ

उत्तर 4 – घ ) लाला अमरनाथ

– लाला अमरनाथ यांनी 15 डिसेंबर 1933 आपल्या पहिल्याच कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंड विरुद्ध 118 धावा करीत कसोटीतील पहिले शतक ठोकणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू बनले होते.

प्रश्न – 5 – भारताच्या कोणत्या शहराला आंब्यांचे शहर म्हटले जाते ?

उत्तर 5 – भारतातील कर्नाटक राज्यातील कोलार जिल्ह्यातील श्रीनिवासपूर या शहराला आंब्याचं शहर म्हटले जाते.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.