प्रोफेशनल लाइफमध्ये ‘या’ चुका कधीच करू नका, अन्यथा गमवावी लागेल नोकरी

ऑफीसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी काही महत्वपूर्ण टिप्स आहेत. या टिप्स फॉलो केल्यास तुम्ही नोकरी वाचवू शकता आणि करिअरमध्ये ग्रोथही मिळवू शकता.

प्रोफेशनल लाइफमध्ये 'या' चुका कधीच करू नका, अन्यथा गमवावी लागेल नोकरी
काम करताना या चुका टाळाImage Credit source: freepik
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 1:17 PM

नवी दिल्ली | 11 ऑगस्ट 2023 : आजच्या काळात खासगी असो किंवा सरकारी (private or government job) , दोन्ही क्षेत्रांमध्येही नोकरी जाण्याचा धोका असतो. अनेक सरकारी विभागांमध्ये सरळ, कायमची नोकरी मिळत नाही. तरुणांची क्षमता तपासण्यासाठी त्यांना सुरुवातीला करारावर किंवा प्रशिक्षणार्थी (as a trainee) म्हणून नियुक्त केले जाते. ही संधी उत्तम प्रकारे शिकण्यासाठी उपलब्ध असते, ज्यामुळे एखादी व्यक्ती परफेक्ट प्रोफेशनल बनू शकते.

नोकरी मिळाल्यानंतरही तुम्ही बेफिकीर राहू शकत नाही. तुमच्या काही सवयी किंवा चुकींमुळे तुम्ही नोकरी गमावू शकता. अशा चुका सुधारण्यासाठी किंवा त्या होऊच नयेत यासाठी काही टिप्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

या चुका करू नका

  1. कंपनी पॉलिसीबद्दल अपडेट रहा : अनेकदा कंपन्या बाजाराच्या मागणीनुसार वेळोवेळी आपली धोरणे आणि नियम बदलत असतात. तुम्ही काम करत असलेल्या कंपनी किंवा विभागामध्ये काही बदल होत असतील तर त्याबद्दल अपडेट रहा. मात्र असे केले नाही तर तुम्ही जुन्या पॉलिसीनुसार काम करत रहाल, ज्यामुळे तुमची इमेज खराब होऊ शकते आणि कदाचित कंपनीचे नुकसानही होऊ शकते.
  2. भीती बाळगू नका : ऑफिसमध्ये बहुतेक लोकं त्यांच्या सीनीअरशी किंवा बॉसशी बोलायला घाबरतात. काम करताना एखादा प्रॉब्लेम आला , कन्फ्युजन झाले तर प्रश्न विचारण्याचीही त्यांनी भीती वाटते किंवा ते सहज प्रश्न विचारू शकत नाहीत. ही सवय तुमचे खूप नुकसान करू शकते. तुम्ही तुमच्या वरिष्ठांना प्रश्न विचारले पाहिजेत आणि कोणताही संकोच न करता प्रवाहानुसार काम केले पाहिजे.
  3. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा : कंपनीत काम करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की त्यांनी कोणत्याही एका कम्फर्ट झोनमध्ये अडकून राहू नये. म्हणजेच, तुम्ही तुमच्या कामात विविधता आणली पाहिजे. तुम्हाला तुमच्या अंगातून आळशीपणा, टाळमटाल करणे किंवा भीती असेल तर ते काढून टाकली पाहिजे. तसेच नेहमी अपडेट रहावे, नवीन गोष्टी जाणून घ्याव्यात आणि लोकांशी चर्चाही करावी.
  4. रिसर्च करा : तुम्हाला प्रोफेशनल आयुष्यात जीवनात सातत्यपूर्ण प्रगती साधायची असेल, तर तुमच्या क्षेत्राबद्दल रिसर्च करणे खूप महत्त्वाचे ठरते. बाजारात काय नवीन गोष्टी आल्या आहेत किंवा येणार आहेत, याची माहिती जरूर ठेवावी. यामुळे तुम्ही तुमच्या टीम किंवा बॉससमोर जाल तेव्हा तुम्हाला काहीतरी नवीन करण्याची कल्पना सुचेल. नवीन गोष्टींबद्दल बॉसशी चर्चा करण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुमची प्रतिमा एक परफेक्ट प्रोफेशनल व्यक्ती म्हणून होईल.
  5. कोणाशीही मतभेद करू नका : नोकरी करणाऱ्या व्यावसायिकांच्या आयुष्यात अनेकदा ऑफीसमधील सहकाऱ्यांसोबत मतभेद होतात. काहीवेळा त्याचा संपूर्ण कंपनीच्या वातावरणावर देखील परिणाम होतो. असे मतभेद टाळले पाहिजेत. यासाठी ऑफिसमध्ये फक्त कामाबद्दल बोलावे. सहकार्‍याशी वाद झाला तरी ते प्रकरण स्वतःच हाताळा, जास्त ताणू नका.
Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.