नवी दिल्ली: कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) ICSE,ISC इयत्ता 10 वीचा निकाल आज जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र, बोर्डाने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. ICSE इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाइट – cisce.org – वर पाहू शकतील. साधारणपणे ISC आणि ICSE निकाल CBSE दहावीच्या बारावीच्या निकालाप्रमाणेच जाहीर केला जातो. CBSE ने 12 मे 2023 रोजी बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर केला होता, त्यामुळे ICSE आणि ISC निकाल कधीही लागण्याची शक्यता आहे. CISCE ने अद्याप कोणतीही अधिकृत नोटीस जारी केलेली नाही.