नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी CBSE च्या निकालाबाबत खोटी बातमी पसरविण्यात आली होती. या बातमीनंतर निकालाची तारीख लवकरात लवकर देण्यात यावी अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली होती. निकाल कधी लागणार याची तारीख आधी CBSE बोर्डाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर किंवा कुठल्याही अधिकृत हँडलवर दिली जाईल असं बोर्डाकडून सांगण्यात आलं. बऱ्याच प्रतीक्षेनंतर आणि फेक न्यूज नंतर अखेर आज CBSE बारावीचा निकाल लागला. आता विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे ती दहावीच्या निकालाची. दहावीचा निकाल कधी लागणार? कुठे लागणार? तो कुठे पाहायचा? वाचा
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. बोर्डाने आज सकाळी 10.12 च्या सुमारास बारावीचा निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे सीबीएसईचा दहावीचा निकालही आजच जाहीर होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. खरं तर बारावी निकालानंतर आता हा दहावीचा निकाल कधीही लागू शकतो. विद्यार्थी आपला निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात – cbse.gov.in किंवा cbse.nic.in. त्याचबरोबर डिजिलॉकर जाऊन जर तुम्हाला हा निकाल पाहायचा असेल तर आधी खाली दिल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन करून घ्या.
डिजीलॉकर आणि उमंग ॲपवरही विद्यार्थी सीबीएसई दहावीचा निकाल पाहू शकतात. बोर्ड हे निकाल आयव्हीआरएस आणि एसएमएसद्वारे देखील देऊ शकते.
स्पेलिंग आणि इतर तपशील योग्यरित्या टाकण्यासाठी निकाल तपासताना उमेदवारांनी त्यांचे सीबीएसई 10 वी प्रवेश पत्र हातात ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
बोर्डाने बुधवारी नोटीस जारी करत दहावी परीक्षा 2023 चा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल, असे म्हटले आहे. बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी निकाल जाहीर झाल्यानंतर डिजीकेबलवर गुणपत्रिका डाऊनलोड करू शकतात. त्यासाठी मंडळाकडून प्रत्येक विद्यार्थ्याला 6 अंकी पिन क्रमांक पाठविण्यात येणार आहे. पिन क्रमांक शाळांना पाठविला जाईल, जो शाळा विद्यार्थ्यांना देतील. सुरक्षेचा विचार करून मंडळाने गेल्या वर्षीपासून ही यंत्रणा सुरू केली आहे.
यंदा 12 वी च्या परीक्षेसाठी 16 लाख 96 हजार 770 विद्यार्थी बसले होते. थोड्याच वेळापूर्वी जाहीर झालेल्या निकालात एकूण 87.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 5 टक्के कमी आहे. त्रिवेंद्रम झोनने 99.91 टक्क्यांसह सर्वोत्तम कामगिरी केली आहे. यंदा मुलींचा निकाल मुलांपेक्षा चांगला लागला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल 6 टक्के चांगला लागला आहे. मुलांचा निकाल 84.67 टक्के, तर मुलींचा निकाल 90.68 टक्के लागला आहे.