CA Foundation Result 2023 : सीए परीक्षा निकाल जाहीर, असा पाहा तुमचा निकाल

ICAI CA Foundation Result 2023 Live : सीए म्हणजे सनदी लेखापाल परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेचा निकाल 24.98 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल वेबसाईटवर जाऊन पाहता येणार आहे.

CA Foundation Result 2023 : सीए परीक्षा निकाल जाहीर, असा पाहा तुमचा निकाल
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 4:07 PM

योगेश बोरसे, पुणे | 8 ऑगस्ट 2023  : द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) घेण्यात येणारा सीए म्हणजेच सनदी लेखापाल परीक्षा निकाल जाहीर झाला आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या या निकालात 24.98 टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले आहे. या परीक्षेसाठी एक लाख 17 हजार 68 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये एक लाख तीन हजार 517 उमेदवारांनी परीक्षा दिली. ही परीक्षा 24, 26, 28 आणि 30 जून 2023 रोजी झाली होती. परीक्षा दिलेल्या उमेदवारांपैकी 25 हजार 860 उमेदवार पास झाले आहेत.

निकाल पाहण्यासाठी असे करा

  • सीए परीक्षाच्या निकाल पाहण्यासाठी icai.nic.in या वेबसाईट भेट द्या
  • वेबसाईटवर गेल्यावर CA Foundation June 2023 results लिंक उघडा
  • लॉगिंन पेजवर रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर टाका
  • रोल नंबर टाकल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा
  • यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • निकाल तुम्ही डाऊनलोड करुन त्याचा प्रिंट आउट काढू शकतात.

डिसेंबरच्या परीक्षेसाठी अजून फॉर्म नाहीत

सीए इंटरमीडीयट परीक्षेसाठी 2 ऑगस्ट 2023 रोजी अर्ज भरणे सुरु होणार होते. परंतु अद्याप ते सुरु झाले नाही. ही परीक्षा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. आता आयसीएआयकडून लवकरच ही प्रक्रिया सुरु करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोण ठरतो पात्र

ज्या उमेदवारांना प्रत्येक विषयात 40 गुणांसह एकूण 50% मिळाले आहे, ते सीए फाउंडेशनच्या परीक्षेसाठी पात्र ठरतात. जे उमेदवार सीए फाउंडेशन परीक्षेत (CA Result 2023) एकूण 70% पेक्षा अधिक गुण मिळवतात ते “passed with distinction” म्हटले जातात.

हे सुद्धा वाचा

आता पुढे काय?

जे उमेदवार सीए फाउंडेशन 2023 परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, ते पुढील टप्प्याची तयारी सुरु करु शकतात. जे उमेदवार जूनमधील परीक्षेत उत्तीर्ण झाले नाहीत, त्यांना ही परीक्षा परत द्यावी लागणार आहे. ही परीक्षा देशभरातील 500 केंद्रांवर घेतली जाते. ICAI या संस्थेकडून परीक्षा घेतली जाते. सर्वात कठीण प्रवर्गात ही परीक्षा ठेवली गेली आहे. यामुळे या परीक्षेचा निकाल कमी लागतो.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.