नवी दिल्ली: CBSE बोर्डा पाठोपाठ आज CISCE बोर्डाचाही निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा CISCE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत मुलींनी चांगली कामगिरी केली आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 98.01 टक्के आहे. तर 95.95 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. त्याचप्रमाणे दहावीत मुलींचा निकाल 99.21 टक्के तर मुलांचा निकाल 98.71 टक्के लागला आहे. सीआयएससीई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट – cisce.org आणि results.cisce.org गुणपत्रिका पाहू शकतात. बोर्डाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, निकाल पाहण्यासाठी रोल नंबर आणि यूआयडी कोड आवश्यक असेल.
निकाल जाहीर करण्याबरोबरच गुणपत्रिका फेरतपासणीचा पर्यायही सीआयएससीई बोर्डाकडून देण्यात आला आहे. जे विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत आपल्या गुणांवर समाधानी नाहीत. ते निकाल तपासणीसाठी 21 मे 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. यासाठी विद्यार्थी अधिकृत वेबसाइट – results.cisce.org आणि शाळेची मदत घेऊ शकतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीनंतर मूळ गुणपत्रिकाही मिळणार आहे.
2022 मध्ये 12चे 99.38 टक्के विद्यार्थी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. देशभरातून 154 विद्यार्थी पहिल्या तीन स्थानांमध्ये होते. सर्वाधिक 23 विद्यार्थी लखनौचे होते. गेल्या वर्षी मुलींचा निकाल 99.52 टक्के तर मुलांचा निकाल 99.26 टक्के लागला होता.