दोस्तांच्या MBA ट्यूशनसाठी 2 महिन्यांची रजा, पाहता पाहता अख्ख्या देशातच क्लास सुरु केले, BYJU’s ची कहाणी वाचलीय?

ब्रँड अँबेसेडर शाहरूख खान, आव्हान देणाऱ्या 8 कंपन्या खिशात घालणाऱ्या, BYJU’s ची कहाणी...

दोस्तांच्या MBA ट्यूशनसाठी 2 महिन्यांची रजा, पाहता पाहता अख्ख्या देशातच क्लास सुरु केले, BYJU’s ची कहाणी वाचलीय?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 2:46 PM

मुंबईः एडटेक स्टार्टअप BYJU’s सध्या (BYJU’s) चर्चेत आहे. एका वृत्तानुसार, कंपनीतून मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांचे राजीनामे (Resignation)घेतले जात आहेत. केरळनंतर कर्नाटकातही कपातीची सुरुवात होतेय. गेल्या 3 वर्षांपासून कंपनी अनेकदा चर्चेत आहे. मागील वर्षी पेटीएमपेक्षा (Paytm) या कंपनीची मार्केट व्हॅल्यू जास्त नोंदवली गेली. भारतातील पहिल्या क्रमांकाचे स्टार्टअप बनण्याचा मानही पटकावला होता. एवढच नाही तर या स्टार्टअपने इतर 8 कंपन्यांचं अधिग्रहण केलं होतं. स्टार्टअपकडे सध्या 1.5 कोटी विद्यार्थी आहेत. तर 65 लाख पेड सबस्क्रायबर्स आहेत. BYJU’sचा प्रवास एवढा सोपा नाहीये. संस्थापक बायजू रविंद्रन यांची कहाणी वाचणं रंजक आहे…

केरळच्या अझिकोड या लहानशा गावातले रविंद्रन. मुलांना फिजिक्स शिकवत. त्यांची पत्नी शोभनवल्ली मॅथ शिकवत असे. दोघांना एक मुलगा झाला. नाव ठेवलं बायजू. आई-वडिलांकडून वारशाने गणित आणि विज्ञान मिळाले. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. विदेशात नोकरी करू लागला.

सगळं सुरळीत सुरु होतं. पण 2003 मध्ये गाडी थांबली. मित्रांना एमबीए करायचं होते. बायजूने 2 महिने नोकरीतून रजा घेतली. मित्रांची ट्यूशन घेतली. मग विचार आला आपणही परीक्षा देऊ.

मजा-मस्तीत अभ्यास केला. परीक्षा दिली. 100 पर्सेंटाइल मिळाले. हा योगायोग असेल वाटलं. पठ्ठ्याने पुन्हा परीक्षा दिली. पुन्हा 100 पर्सेंटाइल आले. त्यानंतर दोन्ही मित्रांनी मिळून मुलांची ट्यूशन घेणं सुरु केलं. लवकरच विद्यार्थ्यांची संख्या 4, 8, 16 2007 मध्ये बायचूची लोकप्रियता एवढी वाढली की ऑडिटोरियममध्ये क्लास घ्यावे लागले. त्याकाळात ऑडिटोरियममध्ये 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी बसू शकत ोते.

लोकप्रियता वाढू लागली तशी देशातील 9 शहरांमध्ये क्लासेस सुरु झाले. 2009 मध्ये व्हिडिओद्वारे क्लास सुरु केले. इथपर्यंत केवळ कॉलेजच्या विद्यार्थ्यांची ट्यूशन सुरु होती.

हळू हळू शालेय इयत्तांवर लक्ष केंद्रीत करायला सुरुवात केली. पहिली ते 12 वी पर्यंत विद्यार्थ्यांना शिकवू लागले. 2015 मध्ये बायजूचे अॅप लाँच झाले. अॅपने पाहता पाहता एवढा वेग घेतला की एडटेक स्टार्टअपच्या जगात इतिहास नोंदवला.

अॅप आल्यानंतर शिकवणी कंटाळवाणी होऊ नये, यावर बायजूजने लक्ष दिलं. अवघड विषय शिकवण्यासाठी ग्राफिक्स वापरले. सोप्या भाषेत शिकवण्यासाठी 5 ते 20 मिनिटांचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली.

सुरुवातीला अॅपवर फ्री एज्युकेशनल व्हिडिओ दाखवले. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक प्रभावित झाले. मग व्हिडिओवर सब्सक्रिप्शन लावलं. अशा प्रकारे प्लॅटफॉर्मचा विस्तार झाला. सध्या 65 लाख पेड सब्सक्राइबर्स आहेत. कोविड काळात जास्त फायदा झाला. ऑनलाइन लर्निंगची क्रेझ वाढली. 2019 मध्ये कंपनीने 184 कोटी रुपये फक्त जाहिरातींवर खर्च केले. शाहरूख खानला ब्रँड अँबेसेडर केलं. कंपनीच्या कक्षा वाढवल्या. मागच्या वर्षी 8 कंपन्यांचं अधिग्रहण केलं. BYJU’s ला तगडं आव्हान देणाऱ्या 8 कंपन्यांचं अधिग्रहण केलं. यात ग्रेडअप, स्कॉलर, एपिक गेम्स, ग्रेट लर्निंगसारख्या स्टार्टअपचा समावेश होता.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.