प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..! पतीच्या खंबीर साथीने शेतात मेहनत करणाऱ्या ‘तिने’ पूर्ण केली PhD, आता डोळ्यांत प्रोफेसर बनण्याचे स्वप्न !
कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे वडिलांनी ज्या मुलीचं लहान वयातच लग्न लावून दिलं, त्याच मुलीने मोल-मजदुरी करून, मुलांनाच सांभाळतानाच शिक्षणही पूर्ण केलं. यामध्ये तिच्या पतीने तिला मोलाची खंबीर साथ दिली....
Sucess Story : आपलं जीवन हा एक असा कॅनव्हास असतो, ज्यावर आपण आपली मेहनत आणि चिकाटीचे रंग भरून आनंदी, यशस्वी आणि सुखी आयुष्य जगतो. परिस्थिती कितीहीी विरोधातील असेल किंवा बिकट असेल तरीही जर दृढ निश्चय केला (firm decision) तर काही ना काही मार्ग निघतोच आणि आपण यशस्वी होतो. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे। हे म्हणतात ते काही खोटं नाही. अशाच एक दृढ निश्चयामुळे आणि मेहनतीमुळे मोल-मजदुरी करणाऱ्या महिलेला (labor completed PhD) तिचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करता आले. वाचूया तिच्या यशाची कहाणी…..
दृढ निश्चय केला तर काहीच असाध्य नाही… आंध्र प्रदेशातील साके भारती (Bharati) या तरुण महिलेने हे सिद्ध करून दाखवले. शिक्षणाची मर्यादित संधी आणि संसाधनांचा अभाव अशा अनेक आव्हानांचा तिला सामना करावा लागला. मात्र तरीही तिने हार न मानता, परिस्थितीशी लढा दिला आणि रसायनशास्त्रात पीएचडी (PhD) पूर्ण करून एक आदर्श निर्माण केला.
शेतमजूर असलेल्या भारतीने एक पत्नी आणि आईची भूमिका निभावतनाच विद्यार्थिनी म्हणूनही तिच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. याच वर्षी तिने श्री कृष्ण देवराज विद्यापीठात पीएचडी करण्यासाठी प्रवेस घेतला. एका गरीब कुटुंबात जन्मलेली भारती ही घरातील सर्वात मोठी मुलगी. लहान वयातच तिचं लग्न झालं. पण लग्नानंतरही तिने शिक्षणाचं स्वप्न अर्धवट सोडलं नाही आणि कठोर मेहनत करत अभ्यास पूर्ण केला. आयुष्यात उच्च पदावर पोहोचण्याचे स्वप्नही तिने पाहिले. तिचा प्रवास खडतर होता.
12वी नंतर झाले लग्न
भारतीच बालपण गरिबीत गेलं, त्यामुळे अभ्यासात विविध अडथळे आले. तिने सरकारी शाळेतून बारीवपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. मात्र घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे तिच्या वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं. मात्र सासरी आल्यावर तिने पतीसमोर शिकायची इच्छा व्यक्त केली. पतीनेही तिला प्रोत्साहन देत शिक्षणासाठी खंबीर पाठिंबा दिला. त्यांच्याच साथीने भारतीने तिला हव ते सर्व साध्य केलं. घरदार, मुलं सांभाळून तिने प्रचंड मेहनत करून अभ्यास करत पीएच.डी मिळवली. शिक्षण पूर्ण करायचे असेल तर गरिबी किंवा परिस्थिती हा त्यातील अडथळा ठरत नाही, हेच भारतीने सिद्ध करून दाखवलं. ‘भारती’ची ही यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहे.
पतीने दिली खंबीर साथ
भारतीचे पती शिवप्रसाद यांनी तिला शिक्षणासाठी, अभ्यासासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. लग्नानंतर त्यांना मुलं झाली, तरीही भारतीने शिक्षणाची कास सोडली नाही. भारतीला फक्त शिकायचं नव्हतं तर घरदार,मुलंही सांभाळायची होती, उदरनिर्वाहासाठी कामही करावं लागायंच.पण तिने या सर्व जबाबदाऱ्या नीट सांभाळत, मोल-मजदुरी करता-करताच दुसऱ्या बाजूला शिकणंही सुरू ठेवलं. हे सर्व सांभाळतानाच तिने अनंतपुर येथील SSBN कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन ाणि पोस्टग्रॅज्युएशनही पूर्ण केले.
भल्या पहाटे उठून, घरातील कामे करून भारती कित्येक किलोमीटर चालत जायची व पुढे बस पकडून ती कॉलेजात पोहोचायची. तिथे मान मोडून अभ्यास केल्यावर घरी येऊन ती पुन्हा शेतात कामही करायची. शिक्षकांच्या सांगण्यावरून तिने पीएचडीसाठी प्रवेश घेतला आणि त्याच मेहनतीने आता पदवी पूर्ण केल्याने तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. नाव-लौकिक मिळत आहे. मात्र ती एवढ्यावरच थांबणारी नाही, तिला आता आणखी उंच भरारी घेऊन, झेप घेऊन कॉलेजमध्ये प्रोफेसर व्हायचे आहे. ते तिचं पुढचं स्वप्न आहे.