Success Story : IIT अलाहाबादच्या विद्यार्थीनीला Amazon चे 1 कोटीचे पॅकेज, वाचा तिची यशोगाधा
अलाहाबाद बीटेक ग्रॅज्यूएट पलक मित्तल हीला अमेरिकेत मुख्यालय असलेल्या ई-कॉमर्स कंपनी एमेझॉनमधून 1 कोटी रुपयांच्या वेतनाचे पॅकेज मिळाले आहे.
नवी दिल्ली | 24 ऑगस्ट 2023 : आयआयटी अलाहाबाद संस्थेने अनेक प्रतिभावंताना तयार केले आहे. येथून शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी तांत्रिक आणि आयटी कंपन्यांचे नेतृत्व केले आहे. देशातील प्रतिष्ठीत संस्थांमध्ये आयआयटी, एनआयटी आणि आयआयएमने दरवर्षी रेकॉर्डब्रेक प्लेसमेंट दिली आहे. आता आयआयटी अलाहाबाद पुन्हा चर्चेत आले आहे. आयआयटी अलाहाबाद मधून बीटेक केलेल्या पलक मित्तल हीला सर्वात मोठी कंपनी Amazon ने तगडे पॅकेज दिले आहे.
अलाहाबाद बीटेक ग्रॅज्यूएट पलक मित्तल हीला अमेरिकेत मुख्यालय असलेल्या ई-कॉमर्स कंपनी एमेझॉनमधून 1 कोटी रुपयांच्या वेतनाचे पॅकेज मिळाले आहे. आयआयआयटीची पलक मित्तल हीला ग्रॅज्यूएट झाल्यानंतर साल 2022 मध्ये अमेझॉनमधून रेकॉर्डब्रेक पॅकेज मिळाल्याने ते ट्रेंडींग होत आहे. पलक मित्तल अमेझॉनमध्ये वेब सर्व्हीसेस ( AWS ) सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम केले आहे.
पलक सध्या बंगळुरुतील कंपनीत कार्यरत
पलक मित्तल हीने 250 हून अधिक AWS च्या सुरक्षेकरीता सॉफ्टवेअर घटक विकसित केले आहेत. तिने या कंपनीसाठी अनेक सुरक्षा स्कॅनर देखील डीझाईन आणि कार्यान्वित केले आहेत. पलक हीच्या क्लाऊड प्लॅटफॉर्मसाठी काम केले आहे. पलक हीचे AWS लॅम्ब्डा, AWS S3, AWS क्लाऊडवॉच, टाईपस्क्रिप्ट, जावा आणि SQL सारख्या प्रोग्रॅमिंग भाषेत काम करण्यात नैपुण्य दाखविले आहे. पलक सध्या बंगळुरु येथील फिनटेक दिग्गज फोनपे कंपनीत काम करीत आहे.
अनुरागला देखील तगडे पॅकेज
याआधी पलक हीचा सहकारी नाशिकच्या अनुराग मकोडे याला एमेझॉन कंपनीचे 1.25 कोटीचे पॅकेज मिळाले होते. अनुराग याच कॉलेजचा विद्यार्थी असून त्यांना आयर्लंड येथील एमेझॉन कंपनीच्या कार्यालयात रुजू झाला आहे. याच संस्थेच्या प्रथम प्रकाश गुप्ता याला गुगलकडून 1.4 कोटीचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. तर अन्य एक ग्रॅज्यूएट अखिल सिंह याला रुब्रिक कंपनीचे 1.2 कोटी रुपयाचे पॅकेज मिळाले आहे.