Yavatmal : संतापलेल्या एसटी चालकाने पोटच्या मुलीचा मृतदेह नेला आगारात , आजारपणावेळी सुट्टी नाकारल्याचा राग

आगार व्यवस्थापकाने रजा न दिल्यामुळे एसटी चालकाची मुलगी उपचारा अभावी तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करित चालकाने चक्क मुलीचा मृत्यूदेह ऑटोने एसटी आगारात आणल्याने मोठी खळबळ उडाली.

Yavatmal : संतापलेल्या एसटी चालकाने पोटच्या मुलीचा मृतदेह नेला आगारात , आजारपणावेळी सुट्टी नाकारल्याचा राग
संतापलेल्या एसटी चालकाने पोटच्या मुलीचा मृतदेह नेला आगारात , आजारपणावेळी सुट्टी नाकारल्याचा रागImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 5:01 PM

यवतमाळ : लालपरी म्हणजेच आपली एसटी आपल्याला नेहमी सेवा पुरवत असते. याच एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि मागण्यांवरुन एसटी एवढं मोठं राज्यव्यापी (St Worker Strike) आंदोलन झालं. मात्र स्थानिक पातळीवर काही एसटी कर्मचाऱ्यांच्या (St Worker) समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. असाच काहीसा प्रकार यवतमाळमध्ये समोर आला आहे. एका एसटी चालक पित्याने आपल्या मुलीचा मृतदेह आगारात आणल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये घडला आहे. एसटी चालक (St Driver) किशोर राठोड यांची चौदा वर्षाची अंपग मुलगी नेहमी आजारी राहत असल्याने तिला दवाखान्यात उपचारासाठी नेण्याकरिता एसटी चालकाने दिग्रसचे आगार प्रमुख संदीप मडावींना रजा देण्याची विनंती केली. मात्र आगार व्यवस्थापकाने रजा न दिल्यामुळे एसटी चालकाची मुलगी उपचारा अभावी तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करित चालकाने चक्क मुलीचा मृत्यूदेह ऑटोने एसटी आगारात आणल्याने मोठी खळबळ उडाली.

मानसिक त्रास देत असल्याचाही आरोप

दरम्यान दिग्रस पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि पोलीस कर्मचारी एसटी आगारात धाव घेत प्रकरण तडजोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र एसटी चालक आक्रमक होत आगार व्यवस्थापक आणि अन्य अधिकाऱ्यांवर त्वरीत कारवाई जो पर्यंत करणार नाहीत, तो पर्यंत आगारातून हलणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने पोलीसांपुढे ही मोठा पेच निर्माण झाला. उशीरा पर्यंत कोणावरही या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. विशेष म्हणजे आगार व्यवस्थापक आणि अन्य दोघे नेहमी चालक राठोड यांना मानसिक त्रास देत असल्याचा आरोप केलाय. त्यामुळे हे प्रकरण सध्या राज्यभर पोहोचले आहे. या प्रकरणात आता पोलीस काय भूमिका घेताहेत हेही पाहणं तितकचं म्हत्वाचं ठरणार आहे.

एवढी भयंकर वेळ का आली?

प्रत्येक मुलीसाठी तिचा वडील हा तिच्या जीवनातला पहिला हिरो असतो. तर मुलगी ही नेहमीच बाबांची लाडकी असते. त्याच मुलीचा मृत्यू झाल्याने या पित्याचा सताप अनावर झाला आहे. त्यातूनच हा प्रकार घडला आहे.  आगार व्यवस्थापक आणि अन्य दोघे नेहमी चालक राठोड यांना मानसिक त्रास देत असल्याचा आरोपातून काय तथ्य बाहेर येतंय? आणि यात आता एसटी महामंडळ या प्रकरणाची चौकशी करून काही तातडीची पाऊलं उचलणार का? तसेच आता या प्रकरणात पोलिसांनी एन्ट्री घेतल्याने या प्रकरणाला आणखी काही वेगळं वळम मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र घडल्या प्रकाराने या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.