Nagpur Crime : पतीच्या ‘त्या’ सवयीचा पत्नीला होता तिटकारा, एक दिवस असह्य झालं अन् तिने थेट….
पतीच्या वाईट सवयीला वैतागलेल्या पत्नीला त्याचा त्रास असह्य झाला होता. अखेर तिने तिच्या मित्रासोबत मिळून असा भयानक प्लान रचला आणि...
नागपूर | 28 ऑगस्ट 2023 : पती-पत्नीचं नातं सात जन्मांचं मानलं जातं. मात्र नात्यात प्रेम, विश्वास आणि आदर असेल तरच ते निभावता येतं. नागपूरमध्ये अशी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे एका पत्नीनेच तिच्या पतीच्या हत्येचा कट (crime news) रचला. तिच्या पतीची हत्या इतर कोणी नाही तर त्याच महिलेच्या बॉयफ्रेंडने केल्याचे समोर आले आहे. रविवारी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे. खरंतर हत्येची ही घटना नागपूरच्या जलालखेडा भागातील आहे. त्या इसमाच्या मारेकऱ्याचा खुलासा करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
नक्की काय झालं ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत इसमाला दारू पिण्याची सवय होती. मात्र त्यानंतर तो दारूच्या नशेतच त्याच्या पत्नीला नेहमी मारहाण करत असे. त्याच्या पत्नी त्याच्या या अत्याचाराला कंटाळली होती. रोजची मारहाण असह्य झाल्यानंतर एका क्षणी तिने पतीलाच संपवण्याचा कट रचला. शनिवारी बंटी या तरूणाने उमेशला त्याच्या घरी दारू पिण्यासाठी बोलावले. दोघे एकत्र गप्पाम मरात बसले आणि बंटीने उमेशला भरपूर दारू पाजली.
दारू प्यायल्यानंतर मारहाण करून हत्या
बंटीने उमेशला इतकी दारू पाजली की तो धड उभाही राहू शकत नव्हता, ना त्याला चालता येत होतं. याच गोष्टीचा फायदा घेत बंटीने उमेशला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. बंटी हा मृत इसमाच्या बायकोचा बॉयफ्रेंड होता. ती पतीच्या दारूच्या व्यसनामुळे अतिशय त्रासली होती. म्हणूनच तिने पतीचा काटा काढण्यासाठी बॉयफ्रेंडची मदत घेतल कट रचला आणि त्याची हत्या करवली.
पोलिसांनी केली आरोपीला अटक
याप्रकरणातील मुख्य आरोपी बंटी आणि मृत इसमाची पत्नी या दोघांनाही अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.