Girlfriend Murder | लिव्ह इन पार्टनरची हत्या, प्रेयसी जिवंत असल्याचं भासवण्याचं पुरेपूर प्लॅनिंग, पण…

आरोपी सुशील कुमारने सपनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे पूर्ण नियोजन केले होते. त्याने सपनाचे पाय दुमडले आणि तिचा मृतदेह एका पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये भरला. त्यानंतर त्याने ते पोते गाडीत ठेवले आणि कोट गावाजवळील कालव्यात फेकून दिले.

Girlfriend Murder | लिव्ह इन पार्टनरची हत्या, प्रेयसी जिवंत असल्याचं भासवण्याचं पुरेपूर प्लॅनिंग, पण...
अमेरिकेहून परतलेल्या वृद्ध जोडप्याची ड्रायव्हरकडून क्रूर हत्याImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 7:31 AM

लखनौ : प्रेयसीची हत्या (Girlfriend Murder) केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रियकराला शनिवारी अटक (Uttar Pradesh Crime News) केली आहे. पोलिसांनी त्याला गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील फाटा चौकात बेड्या ठोकल्या. सुशील कुमार असे आरोपीचे नाव आहे. तो 33 वर्षांचा आहे. आरोपी सुशील कुमारकडून गुन्ह्यात वापरलेली कारही पोलिसांनी जप्त केली आहे. प्रेयसी जिवंत असल्याचं भासवण्याचं पुरेपूर प्लॅनिंग त्याने केलं होतं, मात्र पोलीस तपासात त्याचं बिंग फुटलं. आरोपी सुशील कुमार हा सपनासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता. 15 सप्टेंबर 2021 रोजी सुशील कुमारचा सपनासोबत पार्टी करण्यावरून वाद झाला. यावेळी सुशील कुमार याने सपनाला मारहाण केली आणि नंतर तिची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी सुशील कुमारने सपनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे पूर्ण नियोजन केले होते. त्याने सपनाचे पाय दुमडले आणि तिचा मृतदेह एका पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये भरला. त्यानंतर त्याने ते पोते गाडीत ठेवले आणि कोट गावाजवळील कालव्यात फेकून दिले.

प्रेयसी जिवंत असल्याचं भासवण्याचं पुरेपूर प्लॅनिंग

हत्येच्या घटनेनंतर सुमारे 10 दिवसांनी म्हणजेच 25 सप्टेंबर 2021 रोजी आरोपी सुशील कुमारने सपनाचा मोबाईल फोन त्याच्या गावाजवळ नेऊन सुरु केला. सपनाच्या कुटुंबीयांना ती जिवंत आहे असे भासावे आणि सुशील कुमारवर संशय येऊ नये, म्हणून त्याने तिच्या भावाला मोबाईलवर मेसेजही पाठवला.

हे सुद्धा वाचा

इतकेच नाही तर आरोपी सुशील कुमार 7 ऑक्टोबर 2021 रोजी तिच्या घरीही गेला होता. तिथे त्याने सपनाच्या आईला विश्वासात घेऊन बुलंदशहरमधील सुलेमपूर पोलिस स्टेशनमध्ये सपना बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली, जेणेकरून कुटुंबीय आणि पोलिसांना त्याच्यावर संशय येणार नाही. मात्र पोलिसांनी शिताफीने तपास करत सुशीलचे बिंग फोडले.

Non Stop LIVE Update
detail
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.