Umesh Kolhe murder case : उमेश कोल्हे हत्या प्रकरण, मुख्य सूत्रधाराला नागपुरातून अटक, आतापर्यंत सात जण पोलिसांच्या ताब्यात

अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणी नागपूर येथून मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे.

Umesh Kolhe murder case : उमेश कोल्हे हत्या प्रकरण, मुख्य सूत्रधाराला नागपुरातून अटक, आतापर्यंत सात जण पोलिसांच्या ताब्यात
अटक करण्यात आलेले आरोपी
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 9:25 PM

अमरावती : येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणी नागपूर येथून मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी सात आरोपींना अटक (Seven accused arrested) केली आहे. अमरावतीतील पठाण चौकातील शेख इरफान शेख रहीम (Sheikh Irfan) वय (35 वर्षे) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने उमेश कोल्हे यांची हत्या केली होती. उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार अखेर अमरावती पोलिसांच्या ताब्यात आला.

सातव्या आरोपीला अटक

अमरावतीच्या उमेश कोल्हेची हत्या नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळं झाल्याची माहिती आहे. 21 जून 2022 रोजी रात्र उशिरा मेडिकलमधून घरी जाताना हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यातच गाठलं. चाकूने सपासप वार केले. या प्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे. मुदस्सीर आणि शाहरूख पठाण यांना 23 जूनला अटक करण्यात आली. अब्दुल तौफिक, शोएब खान, अतिब रशीद या तिघांना 25 जूनला अटक करण्यात आली. आज या प्रकरणातला सातवा आरोपी शेख इरफान शेख रहीम वय (35 वर्षे) याला अटक करण्यात आली.

हत्येनंतर व्हिडीओ जारी

अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचे कनेक्शन थेट नुपूर शर्मा प्रकरणाची जोडण्यात आले. उदयपूरमध्ये कन्हैयालाल नावाच्या टेलरची हत्या झाली. त्याच्या आठवडाभरापूर्वीच उमेश कोल्हेची हत्या झाल्याचा दावा करण्यात आला. हत्येनंतर एक व्हिडीओ जारी करण्यात आला. शस्त्र दाखवून हत्येची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती. उदयपूर शहरातील मालदास स्ट्रीट येथे ही घटना घडली. कन्हैयालाल टेलर त्याच्या दुकानात होता. दोन तरुणांनी हल्ला केला. शेजारी धावून आले. तोपर्यंत आरोपी पळून गेले. पोलिसांना माहिती देण्यात आली. व्यापाऱ्यांना विरोध केला. दुकानं बंद करण्यात आली. पोलिसांनी बंदोबस्त वाढविला.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.