तुम्हीही पार्टटाईम नोकरी शोधत आहात का?, मग ही बातमी वाचाच, अन्यथा तुमच्यासोबत हे घडू शकते

सायबर गुन्हेगारांनी देशभरात आपले जाळे पसरवले आहे. फसवणूक करण्यासाठी गुन्हेगार नवनवीन फंडे अवलंबत आहेत. अशीच एक घटना पुण्यात उघडकीस आली आहे.

तुम्हीही पार्टटाईम नोकरी शोधत आहात का?, मग ही बातमी वाचाच, अन्यथा तुमच्यासोबत हे घडू शकते
जॉब ऑफरImage Credit source: Google
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 7:37 PM

पुणे : ऑनलाईन टास्क स्कॅम किंवा पार्टटाईम नोकरीचा घोटाळा देशभरात, विशेषतः महाराष्ट्रातील पुणे शहरात पसरत आहे. शहर आणि आसपासच्या भागातील अनेक लोकांनी या ऑनलाईन पार्टटाईम नोकरीच्या ऑफरला बळी पडून पैसे गमावल्याचे उघडकीस आहे. गुन्हेगार विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे लोकांशी संपर्क साधतात आणि पार्टटाईम नोकरीद्वारे अधिक पैसे कमावण्याचे आमिष दाखवत लाखोंची फसवणूक करतात. अशीच एक घटना नुकतीच पुण्यात उघडकीस आली आहे. अशाच आमिषाला बळी पडलेल्या पुण्यातील एका व्यक्तीला जवळपास एक कोटी रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात चित्रपट निर्मात्याला 96 लाखाला गंडा

सायबर गुन्हेगारांनी 25 सप्टेंबर ते 5 नोव्हेंबरदरम्यान 56 वर्षीय जाहिरात, चित्रपट निर्मात्याची 96.57 लाख रुपयांची फसवणूक केली. बावधन-एनडीए रस्त्यावरील रामबाग कॉलनीत राहणार्‍या पीडित व्यक्तीला त्याच्या मोबाईलवर एक एसएमएस आला होता. या एसएमएसमध्ये त्याला पार्टटाईमची नोकरीची ऑफर देण्यात आली होती. त्याने मेसेजमध्ये दिलेल्या नंबरला रिप्लाय दिल्यावर त्याला चॅट अॅपवरील ग्रुपमध्ये सामील होण्यास सांगण्यात आले.

सदर व्यक्तीने नोकरीला सहमती दर्शवली असता आरोपींनी त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याला “वेलकम बोनस” म्हणून 10,000 रुपये दिले आणि कॉर्पोरेट ट्रॅव्हल मॅनेजमेंट (CTM) व्यवसायांचे मूल्यांकन करण्यासाठी चांगले परतावा देण्याचे वचन दिले. यानंतर त्यांनी त्याला अधिक परतावा मिळविण्यासाठी काही प्री-पेड टास्क पूर्ण करण्यास सांगितले. पीडित व्यक्ती हे टास्क पूर्ण करत गेला. मात्र आपली फसवणूक होतेय हे लक्षात येईपर्यंत पीडिताच्या खात्यातून लाखो रुपये आरोपींनी लुटले होते.

हे सुद्धा वाचा

‘अशी’ केली फसवणूक

पीडितेने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी प्रथम पीडित व्यक्तीला ट्रॅव्हल एजन्सीचे रेटिंग आणि पुनरावलोकन करण्याचे काम सोपवण्यापूर्वी प्री-पेड नोकऱ्यांसाठी दोन हप्त्यांमध्ये 21,990 रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी पीडिताला 24,809 रुपये परत केले. नंतर, त्यांनी त्याला आठ पुनरावलोकनांसाठी 80,000 रुपये भरण्यास सांगितले आणि कमिशनसह एकूण 94,840 रुपये दिले.

काही दिवसांनी घोटाळेबाजांनी पीडिताकडे नोकरीसाठी एक लाख रुपये मागितले आणि कमिशनसह पैसे परत दिले नाहीत. पीडितेने पैसे मागितले असता, त्यांनी त्याच्याकडे 35.25 लाख रुपयांची मागणी केली आणि भरपूर कमिशनसह संपूर्ण रक्कम परत करू असा दावा केला. मात्र, मागितलेली रक्कम भरून आणि दिलेले काम पूर्ण करूनही पीडिताला त्याचे कमिशन मिळाले नाही. त्याऐवजी, फसवणूक करणार्‍यांनी त्याला अधिक गुंतवणूक करण्यास आणि प्रलंबित असलेल्या सर्व कर्जांसह त्यांची सर्व कर्जे भरण्यास सांगितले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडिताची पोलिसात धाव

पीडिताने 61.32 लाख रुपये दुसऱ्यांदा ट्रान्सफर केल्यानंतर त्याला पैसे किंवा कमिशन न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे पीडिताच्या लक्षात आले. नंतर पीडिताने कोणतीही प्री-पेड कार्ये करण्यास नकार देताच आरोपींनी त्याच्याशी सर्व संपर्क तोडले. अहवालात असे उघड झाले आहे की पीडितेने नेट बँकिंग, जी-पे आणि पेटीएम सेवांद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 58 व्यवहार केले.

सायबर पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 419, 420 आणि 34 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 C आणि 66 (D) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनंतर, पोलिसांनी मॅसेंजर अॅप्लिकेशनवरील पीडित आणि आरोपी यांच्यात झालेल्या मॅसेजचे तपशील शेअर करण्यास सांगितले आहे आणि बँकांकडे व्यवहाराच्या तपशीलांची माहिती मागवली आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.