नाशिकमध्ये अफगाणी सुफी बाबाच्या हत्येबाबत धक्कादायक खुलासा; एका आरोपीला पोलिसांकडून अटक

चिश्ती याला येवला येथील सुफी बाबा म्हणून ओळखले जाते. झरीफ चिश्ती यांच्या ट्विटर हँडलनुसार, त्यांना पीस ग्लोबल सेंटर लंडनकडून पीस दूत पुरस्कार देण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईपासून 200 किलोमीटर अंतरावर येवल्यातील चिंचोडी येथील एमआयडीसी परिसरातील मोकळ्या भूखंडावर त्यांची हत्या झाली.

नाशिकमध्ये अफगाणी सुफी बाबाच्या हत्येबाबत धक्कादायक खुलासा; एका आरोपीला पोलिसांकडून अटक
ख्वाजा सय्यद चिश्ती उर्फ ​​झरीफ बाबाImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 10:31 PM

नाशिक : नाशिकच्या येवल्यामध्ये (Nashik Murder News) झालेल्या अफगाणी मुस्लिम धर्मगुरूच्या हत्ये प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेनं संपूर्ण नाशिक हादरलंय. आर्थिक व्यवहार आणि प्रॉपर्टीच्या वादातून हे हत्याकांड (Nashik Crime News) घडल्याची माहिती पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे. अहमद चिश्ती असं या धर्म गुरुचं नाव आहे.

चिश्ती याला येवला येथील सुफी बाबा म्हणून ओळखले जाते. झरीफ चिश्ती यांच्या ट्विटर हँडलनुसार, त्यांना पीस ग्लोबल सेंटर लंडनकडून पीस दूत पुरस्कार देण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईपासून 200 किलोमीटर अंतरावर येवल्यातील चिंचोडी येथील एमआयडीसी परिसरातील मोकळ्या भूखंडावर त्यांची हत्या झाली.

हल्लेखोरांनी सुफीच्या डोक्यात गोळी झाडली, त्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर हल्लेखोरांनी मृताची एसयूव्ही कार घेऊन पलायन केले. घटनेची माहिती मिळताच तपासासाठी दाखल झालेल्या पोलिसांनी सुफी बाबाची एसयूव्ही जप्त केली आहे. या हत्या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी पकडले असून, उर्वरित मारेकऱ्यांची चौकशी सुरू आहे. मारेकऱ्यांचे पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही स्कॅन करत आहेत.

कोण आहे अहमद चिश्ती?

अहमद चिश्ती हा मूळचा अफगणिस्तानचा नागरीक आहे. तो रेफ्युजी म्हणून राहत होता. त्यांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या नावावर प्रॉपर्टी घेतली होती. त्यानंतर तो फरार झाला होता. अहमद चिश्तीचं वय 35 वर्ष होतं. रात्रीच्या सुमारास पुजा झाल्यानंतर त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आर्थिक उलाढाली आणि प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी त्याची हत्या करण्यात आलेय.

पुजा विधीच्या माध्यमातून कोट्यावधीची कमाई

सुफी परंपरेने पुजा विधी करून चिश्तीने नाशिक शहरात स्वत:ची ओळख वाढवली. सोशल मीडिया, भक्तांकडून मिळणारी देणगी यावर त्यांचा उदरनिर्वाह होत होता. चिश्ती निर्वासित असल्याने त्यांना भारतात मालमत्ता विकत घेता येत नव्हती. त्यामुळे त्याने त्याचे चालक, सेवेकरी व विश्वासू लोकांच्या नावाने अनेक मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या तीन ते चार वर्षात चिश्ती याने इतरांच्या नावे सुमारे तीन कोटी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.त्याने कार देखील ड्रायव्हरच्या नावावर खरेदी केले होती. यामुळे संपत्ती बळकावण्याच्या हेतूने मारेकऱ्यांनी जरीफ यांचा खून केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.