Nanded | धक्कादायक ! नांदेडमध्ये नीलगायीची हत्या करून पार्टी? भाजप आक्रमक,आरोपींवर कारवाई करण्याची मागणी!

निलगायीची हत्या करुन पार्टी करणाऱ्यांविरोधात वन्यजीव कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली आहे. शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे 10 दिवसाचे अलटीमेटम दिले आहे. आरोपींवर कडक कारवाई न केल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय.

Nanded | धक्कादायक ! नांदेडमध्ये नीलगायीची हत्या करून पार्टी? भाजप आक्रमक,आरोपींवर कारवाई करण्याची मागणी!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 5:40 PM

नांदेडः नांदेडमध्ये नीलगायीची (Nilgai) हत्या करून तिच्या मांसाची पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुदखेड (Mudkhed) तालुक्यातील वाई येथील जंगलात हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या जंगलात बंदुकीने गोळी झाडून आधी नीलगायीची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर अनेकांनी नील गायीच्या मांसावर ताव मारल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला असूनही पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपने (Nanded BJP) केला आहे. वन्यजीव कायद्याअंतर्गत नीलगायीची हत्या करून त्यावर पार्टी करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली आहे.

काय घडली नेमकी घटना?

नांदेडमध्ये मुदखेड तालुक्यातील नाई येथील जंलात बंदुकीने गोळी झाडून नीलगायीची हत्या करण्यात आली. त्यानंतर या गायीचे मांस इफ्तार पार्टीत वापरण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. या प्रकरणात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकाला वन विभागाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान हे प्रकरण दडपत असल्याचा आरोप भाजपचे महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी केला आहे. निलगाईची हत्या एका इफ्तार पार्टीसाठी करण्यात आल्याचा गंभीर आरोप ही साले यांनी केलाय… भाजपचं एक शिष्टमंडळ उपवनसंरक्षकांना भेटले. निलगायीची हत्या करुन पार्टी करणाऱ्यांविरोधात वन्यजीव कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली आहे. शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे 10 दिवसाचे अलटीमेटम दिले आहे. आरोपींवर कडक कारवाई न केल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय.

भाजप शहराध्यक्ष काय म्हणाले?

नांदेडचे भाजप शहराध्यक्ष प्रवीण साले म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकार आल्यापासून अनेक विभागावर पकड राहिलेली नाही. महसूलमध्ये अवैध रेती उपसा होत आहे. पोलीस विभागाच्या दुर्लक्षामुळे दिवसा ढवळ्या हत्या होत आहेत. काल तर फॉरेस्ट क्षेत्रातही असा प्रकार दिसून आला. रमजान ईदनिमित्तच्या पार्टीत सगळ्यात संरक्षित असलेल्या नीलगाय या जनावराची हत्या करण्यात आली. इफ्तार पार्टीत ते वाढण्यात आलं. एक क्विंटल मास देण्यात आलं. आयोजकही राजकीय लोकच असले पाहिजेत. ज्या बंदुकीनं हत्या झाली, तो नांदेडमधला आहे. ज्यानं हत्या केली तो अटकेत आहे. इतर आरोपींची नावं सांगण्यासाठी अधिकारी मनाई करतात. सगळ्याच विभागात ही परिस्थिती आहे. आघाडी सरकारमध्ये अनागोंदी माजली आहे, असा आरोप साले यांनी केला.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.