Mumbai Crime : ‘नाहीतर तुमचे ‘तसले वाले फोटो’ व्हायरल करेन!’ मुंबईच्या खारमध्ये डॉक्टर दाम्पत्याला धमकी

Mumbai Khar Crime News : ...तसं होऊ द्यायचं नसेल, तर बऱ्याबोलाने मी सांगत असलेली रक्कम पोहोचती करा, अशी धमकी डॉक्टरला देण्यात आली.

Mumbai Crime : 'नाहीतर तुमचे 'तसले वाले फोटो' व्हायरल करेन!' मुंबईच्या खारमध्ये डॉक्टर दाम्पत्याला धमकी
काय नेमकं प्रकरण?Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 8:00 AM

मुंबई : मुंबई उपनगरातील (Mumbai Crime News) एका डॉक्टर दाम्पत्याला धमकावण्यात आलं आहे. या डॉक्टर दाम्पत्याचे (Doctor Couple) जवळीक साधलेले असतानाचे अत्यंत खासगीतील फोटो (Intimate Photos) एका चोरले. त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी हे फोटो डॉक्टर दाम्पत्याला पाठवून धमकावण्यात आलं आहे. फोनवरुन डॉक्टर दाम्पत्याला धमकी देण्यात आली. मी सांगत असलेली रक्कम मला दिली नाही, तर तुमचे तसले वाले फोटो व्हायरल करेन, अशी धमकी डॉक्टर दाम्पत्याला देण्यात आली. या धमकीची गंभीर दखल घेत डॉक्टर दाम्पत्य अखेर पोलीस स्थानकात पोहोचलं आणि त्यांनी धमकी देणाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. डॉक्टर दाम्पत्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत आरोपीची शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तब्बल सहा वर्षांपूर्वीचे हे फोटो आता कसे काय त्याच्यापर्यंत पोहोचले, याचा तपासही पोलिसांकडून केली जाते आहे. सध्या फरार आरोपीचा पकडण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असून लवकरच त्याला ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे.

मुंबईत नेमका कुठे घडला प्रकार?

खार पोलिस स्थानकात एक एफआयआर दाखल करण्यात आला. यात करण्यात आलेल्या आरोपांनुसार एका डॉक्टरला आणि त्याच्या पत्नीला धमकी देण्यात आली. डॉक्टरचे त्याच्या पत्नीसोबत इंटिमेट फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. तसं होऊ द्यायचं नसेल, तर बऱ्याबोलाने मी सांगत असलेली रक्कम पोहोचती करा, अशी धमकी डॉक्टरला देण्यात आली. एम जियाबुद्दील अब्दुल अझिज याच्याविरोधात अखेर डॉक्टरांनी पोलीस स्थानकात धमकी दिल्याप्रकरणी आरोप करत एफआयआर नोंदवला आहे. 2016 साली अब्दुल अझिज हा डॉक्टरकडे कामाला होता. सहा वर्षांपूर्वी त्याने अत्यंत खासगीतले डॉक्टरेच फोटो चोरले होते. दरम्यान, सहा वर्षानंतर अझिजने असं का केलं, असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला. सहा वर्ष तो गप्प का होता, यावरुन पोलिसांनाही शंका आली आहे.

हे सुद्धा वाचा

का धमकावलं?

अब्दुल अझिज हा सहा वर्षांपूर्वी डॉक्टरकडे काम करायला. डॉक्टर दाम्पत्य खारमध्ये एक हॉस्पिटल चालवतं. या हॉस्पिटलमध्ये अब्दुल अझिज कामाला होता. दरम्यान, त्याच्यावर चोरीचा आरोप करण्यात आला होता. चोरीच्या तक्रारीमुळे अझिज अडचणीत आला आणि त्यानंतर आता बदला घेण्यासाठी सहा वर्षांनी त्याने फोन करत धमकी दिलीय. डॉक्टर दाम्पत्याला धमकी देत त्यांचे ‘तसले वाले फोटो’ ही फोनवरुन अझिजने पाठवले. हे फोटो पाहून डॉक्टर दाम्पत्य हादरुनच गेलंय. अखेर हिंमत करत डॉक्टरने खार पोलिसात धाव घेतली आणि याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे.

सध्या पोलिसांनी याप्रकरणी अधित तपास सुरु केला असून एक पथकंही फरार आरोपीला शोधण्यासाठी कामाला लावलं आहे. अब्दुलच्या अटकेनंतरच त्याने नेमकं अशाप्रकारे धमकी का दिली, हे स्पष्ट होईल, असंही पोलिसांनी म्हटलंय.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.