ATM Cash Theft | एटीएम कॅश व्हॅनसह ड्रायव्हर पसार, नवी मुंबईत 82 लाखांची लूट

एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी निघताना गाडीत 2 कोटी रुपयांची रोकड होती, तर जेव्हा चालक गाडी घेऊन फरार झाला, तेव्हा गाडीत 82 लाख रुपये असल्याचा दावा केला जात आहे.

ATM Cash Theft | एटीएम कॅश व्हॅनसह ड्रायव्हर पसार, नवी मुंबईत 82 लाखांची लूट
एटीएमची कॅश व्हॅन घेऊन चालक पसारImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 11:40 AM

नवी मुंबई : एटीएम सेंटरमध्ये (ATM Center) पैसे भरणारी कॅश व्हॅन घेऊन ड्रायव्हर पसार झाला. नवी मुंबईमध्ये ही धक्कादायक घटना (Navi Mumbai Crime) उघडकीस आली आहे. कारसह चालक परागंदा झाला, त्यावेळी गाडीत 82 लाख रुपयांची रोकड असल्याची माहिती आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. महिंद्रा बोलेरो गाडी घेऊन चालक, सुरक्षारक्षक आणि एटीएममध्ये पैसे टाकणारी व्यक्ती उरण परिसरात पैसे भरुन बामनडोंगरीला निघाली होती. तिथल्या सर्व एटीएम सेंटरमध्ये पैसे टाकण्यासाठी सुरक्षारक्षक आणि अन्य व्यक्ती गेले असताना चालकाने गाडी घेऊन पळ (ATM Cash Theft) काढला.

एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी निघताना गाडीत 2 कोटी रुपयांची रोकड होती, तर जेव्हा चालक गाडी घेऊन फरार झाला, तेव्हा गाडीत 82 लाख रुपये असल्याचा दावा केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

एटीएम सेंटरमध्ये भरण्यासाठी असलेले पैसे घेऊन गाडीसकट ड्रायव्हर पसार झाल्याचा प्रकार नवी मुंबईमध्ये उघडकीस आला आहे. 82 लाख रुपयांची रोकड चालकाने चोरल्याचा दावा केला जात आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचं समोर आलं.

महिंद्रा बोलेरो गाडी घेऊन चालक, सुरक्षारक्षक आणि एटीएममध्ये पैसे टाकणारी व्यक्ती नवी मुंबईतील उरण परिसरात पैसे भरुन बामनडोंगरी भागाकडे निघाली होती. तिथल्या सर्व एटीएम सेंटरमध्ये पैसे टाकण्यासाठी सुरक्षारक्षक आणि अन्य व्यक्ती गेले असताना चालकाने संधी साधून गाडीसह पळ काढला.

गाडी पारसिकजवळ आढळली, चालक पसार

सुरक्षारक्षकांनी नवी मुंबईतील एनआरआय पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गाडीचा शोध घेतला, तेव्हा ही गाडी बेलापूर येथे पारसिक येथे आढळून आली आहे. मात्र चालक अद्यापही पैशांसह फरार आहे.

विशेष म्हणजे या कंपनीने चालकाचं साधं आधार कार्डही घेतलं नव्हतं. त्यामुळे पोलिसांना चोराला पकडण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईच्या मालवणी भागात घरफोडी करून पळणारा चोरटा CCTVमध्ये कैद

Pune CCTV | मंदिर एकच, चोरी चौथ्यांदा, पुण्यात सिंहगड रोडवरील देवळात दानपेटी फोडली

Nanded | वाह रे चोरा.. आधी हात जोडले अन् मग देवाच्या दानपेटीवर डल्ला, नांदेडच्या मंदिरातली चोरी CCTV त कैद

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.