Kurla Building Collapse : मोठी बातमी ! कुर्ला इमारत दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

कुर्ला पूर्व नेहरू नगर परिसरातील नाईक नगर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी आहे. या सोसायटीतील एक चार मजली इमारत काल मध्यरात्री कोसळली. या इमारतीत 20 ते 25 कुटुंब राहत होती. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली लोक अडकले गेले. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल आणि एनडीआरएफने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले.

Kurla Building Collapse : मोठी बातमी ! कुर्ला इमारत दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत
कुर्ला इमारत दुर्घटना प्रकरण, घर मालकासह दोघांवर गुन्हा दाखलImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 6:29 PM

मुंबई : कुर्ला पूर्व शिवसृष्टी रोड येथे एक चार मजली इमारत मध्यरात्री कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. इमारत फार जुनी होती. इमारत धोकादायक असल्याने महापालिकेने इमारत खाली करण्याची नोटीसही दिली होती. मात्र तरीही रहिवाशी या धोकादायक इमारतीत राहत होते. घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून बचाव कार्य (Rescue Operation) सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृतांच्या नातवाईकांना राज्य शासनातर्फे पाच लाखांची मदत (Help) जाहीर करण्यात आली आहे. जखमींना उपचारासाठी सायन आणि राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून पाच लाखांची मदत – सुभाष देसाई

कुर्ला परिसरातील नाईकनगर सोसायटीची इमारत कोसळून त्यात मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनातर्फे पाच लाखांची मदत करण्यात येईल, अशी माहिती नगरविकासमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिली. नाईकनगर सोसायटीची चार मजली इमारत कोसळून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे नगरविकासमंत्री सुभाष देसाई यांनी घटनास्थळाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून जखमींना सर्वोतोपरी सहकार्य करण्याबाबत सूचना केल्या. अपघातातील सर्व जखमींचा खर्च राज्य शासन तसेच महापालिकेच्या वतीने करण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले.

अग्नीशमन दलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

कुर्ला पूर्व नेहरू नगर परिसरातील नाईक नगर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी आहे. या सोसायटीतील एक चार मजली इमारत काल मध्यरात्री कोसळली. या इमारतीत 20 ते 25 कुटुंब राहत होती. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली लोक अडकले गेले. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल आणि एनडीआरएफने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. बचाव पथकाने आतापर्यंत 26 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आहे. यापैकी 14 जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य 12 जण जखमी असून त्यांच्यावर सायन आणि राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यात अजूनही काही जण फसले असून अग्नीशमन दल आणि एनडीआरएफ युद्धपातळीवर बचावकार्य करत आहे.

हे सुद्धा वाचा

मालकाच्या बेजबाबदारपणामुळे घडली दुर्घटना

इमारत खाली करण्यासाठी इमारतीच्या मालकाला नोटीस बजावण्यात आली होती. तरीसुद्धा मालकाने रहिवाशांना इकडेच राहण्यास सांगितले. यामुळे या घटनेला मालक जबाबदार आहे. अद्याप मालक घटनास्थळी भेट द्यायला आला नाही, असे एका रहिवाशाने सांगितले. दरम्यान, मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि मुंबई उपनगर कलेक्टर यांनी कुर्ला दुर्घटनेच्या घटनास्थळाला भेट दिली. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. (At least 10 people have been killed so far in a four storey building accident in Kurla)

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.