Ambarnath : दगड, ड्रम, लाठ्याकाठ्या! घरभाडं थकवणाऱ्याला घरमालकाची बेदम मारहाण, थरारक झटापट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Ambarnath Crime News : अंबरनाथ पश्चिमेच्या उलन चाळ परिसरात उस्मान अकबरअली अन्सारी हा तरुण अब्दुल रहमान याच्या घरात भाड्याने राहत होता. बुधवारी दुपारच्या सुमारास घरमालक अब्दुल रहमान हा भाडेकरू उस्मान याच्याकडे घरभाडं मागण्यासाठी गेला. त्यावेळी उस्मान याने त्याला भाडं दिलं नाही.

Ambarnath : दगड, ड्रम, लाठ्याकाठ्या! घरभाडं थकवणाऱ्याला घरमालकाची बेदम मारहाण, थरारक झटापट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
थरारक झटापटImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 10:17 AM

अंबरनाथ : दगड, पेव्हरब्लॉक, लाठ्याकाठ्या, लाथा, बुक्के, पाण्याचा ड्रम, मिळेल त्या वस्तूने एका व्यक्तीला अंबरनाथमध्ये मारहाण  करण्यात आली. मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव उस्मान अकबरअली अन्सारी (Usman Akbarali Ansari) असं आहे. तीन ते चार जण उस्मान याला मारहाण करताना सीसीटीव्ही (CCTV Video) कॅमेऱ्यात दिसून आले आहेत. ही घटना अंबरनाथ (Ambarnath Crime News) पश्चिम परिसरात घडली. या मारहाणप्रकरणी पोलिसांनी गुन्हादेखील नोंदवला आहे. मात्र अद्याप कुणाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून याप्रकरणी पुढील तपास केला जातोय.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काय दिसलं?

समोर आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात उस्मान हा एके ठिकाणी आल्यानंतर त्याच्यावर दोघे जण हल्ला करताना दिसले. आधी त्याच्या अंगावर पाण्याचा ड्रमही फेकण्यात आला. त्यानंतर लाकडी दंडुक्याने त्याला मारहाण करण्यात आली. आपल्यावर हल्ला झाल्याचं पाहून उस्माननेही प्रतिकार केला.

यावेळी परस्परांवर रस्त्यावर पडलेले दगड भिरकावले गेले. त्यानंतर हाताने प्रहार केला गेला. अखेर एक लाकडी काठी हातात घेऊन उस्मान सुरक्षित अंतरवार उभा राहिला. पण त्यावेळी त्याच्यावर समोरुन दगड भिरकावण्यात आले. आपल्यावर झालेले वार चुकवत अखेर उस्मान याने पळ काढला. त्यानंतर अन्य दोघेजणही त्याच्या मागे धावले. भररस्त्यामध्ये सुरु असलेली ही मारहाण पाहून परिसरात तणाव निर्माण झाला होता.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, दुसऱ्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एके ठिकाणी उस्मान याला जमिनीवर आडवा पाडून त्याला जबर मारहाण करण्यात आली. या थरारक घटनेचं सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागलंय. पोलीसांकडून या संपूर्ण घटनेचा आता तपास केला जातो आहे.

का केली मारहाण?

अंबरनाथ पश्चिमेच्या उलन चाळ परिसरात उस्मान अकबरअली अन्सारी हा तरुण अब्दुल रहमान याच्या घरात भाड्याने राहत होता. बुधवारी दुपारच्या सुमारास घरमालक अब्दुल रहमान हा भाडेकरू उस्मान याच्याकडे घरभाडं मागण्यासाठी गेला. त्यावेळी उस्मान याने त्याला भाडं दिलं नाही.

पाहा LIVE घडामोडी : Video

या रागातून अब्दुल रहमान याने एहसान अन्सारी, इरफान अन्सारी आणि फिरोज या त्याच्या 3 साथीदारांना सोबत घेतलं आणि भाडेकरू उस्मान अकबरअली अन्सारी याला मारहाण केली. लाकडी दांडके, दगड, फरशा, हाताला जे मिळेल ते घेऊन त्याला मारहाण करण्यात आली. इतकंच नव्हे, तर त्याच्या दुचाकीचीही मोडतोड करण्यात आली.

यावेळी झालेली थरारक झटापट तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात एहसान अन्सारी, इरफान अन्सारी, फिरोज आणि अब्दुल रहमान या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. सध्या पोलिसांकडून याप्रकरणी पुढील तपास केला जातोय.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.