India Pakistan Border Smuggling : भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोनद्वारे स्मगलिंगचा प्रयत्न, सैन्याने पाडलं चायनीज बनावटीचं ड्रोन

पंजाब बॉर्डवर मात्र थोडा वेगळा प्रकार समोर आला आहे. पंजाब सीमेवर ड्रोनद्वारे स्मगलिंग करण्याचा स्मगलरांचा प्रयत्न होता. पंजाबमधील अमृतसर सीमेवर भारतीय सैन्याने ड्रोन स्मगलिंगचा प्रयत्न हाणून पाडला आहे.

India Pakistan Border Smuggling : भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोनद्वारे स्मगलिंगचा प्रयत्न, सैन्याने पाडलं चायनीज बनावटीचं ड्रोन
भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोनद्वारे स्मगलिंगचा प्रयत्नImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 5:03 PM

पंजाब : सीमाभागातल्या स्मगलरांनी (Smuggling) सध्या पुन्हा डोकं वर काढलंय. कधी ड्रोनद्वारे तर कधी जमिनीवरून स्मगलिंगचे प्रयत्न सीमाभागात सुरू आहे. मात्र गेल्या दोन दिवसात स्मगलरांचे हे प्रयत्न हाणून पााडण्यात सैन्याला (Indian Army) मोठं यश प्राप्त झालं आहे. मघालय बॉर्डवर सैन्याने मोठी कारवाई करत स्मगलरांचे मनसुबे उधळल्याची घटना काल समोर आल्यानंतर आज पंजाबमध्येही (India Pakistan Border) अशीच घटना घडली आहे. मेघालय बॉर्डवर चक्क मानवी केसांची तस्करी आणि गुरांची तस्करी सैन्याने हाणून पाडली आहे. तर पंजाब बॉर्डवर मात्र थोडा वेगळा प्रकार समोर आला आहे. पंजाब सीमेवर ड्रोनद्वारे स्मगलिंग करण्याचा स्मगलरांचा प्रयत्न होता. पंजाबमधील अमृतसर सीमेवर भारतीय सैन्याने ड्रोन स्मगलिंगचा प्रयत्न हाणून पाडला आहे. बीएसएफच्या जवांनी फायरिंग करून हे ड्रोन पाडले असल्याची माहिती समोर आली आहे.

चायनीज बनावटीचे ड्रोन

सीमाभागात ही घटना गुरूवारी रात्री घडल्याची माहिती सैन्याकडून देण्यात आली आहे. जसा पाकिस्तानच्या सीमेतून ड्रोन भारतात घुसू लागला तशी लगेज भारतीय सैन्याकडून फायरिंग सुरू करण्यात आले. त्यानंतर भारतीय सैन्याने लगेच सर्च ऑपरेशन सुरू केले. यात चीनी बनावटीचे डीजेआय मेट्रिस 300 हे ड्रोन पडल्याचे सापडले. ड्रोनद्वारे स्मगलिंगचा प्रयत्न होणे ही सीमाभागातील ही पहिलीच घटना नाही. याआधीही अशा अनेक घटना या भागात घडल्या आहेत. सैन्याने आधीही अशीच सतर्कतता दाखवत त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. यापूर्वीही अमृतसर बॉर्डवर सैन्याला सर्च ऑपरेशनदरम्यान अंमली पदार्थ सापडले असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे सीमाभागातील सतर्कता वाढवण्यात आली होती. त्यामुळेच सैन्याला ही कामगिरी करणे शक्य झाले आहे.

अंमली पदार्थांच्या तस्करीचा प्रयत्न

सैन्याने दिलेल्या माहितीनुसार सीमाभात गस्तीवर असलेल्या जवानांना सर्च ऑपरेशरदरम्यान अंमली पदार्थाची दोन पाकीटं सापडली होती. या पॉकेटमध्ये हेरॉईन असल्याचा संशय सैन्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. या अमली पदार्थाचे वजन एक किलोच्या आसपास असल्याची माहिती सैन्याकडून देण्यात आली आहे. सीमा सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या तारांजवळ ही पाकीटे सापडल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवासांपासून सीमाभागात स्मगलरांचा सुळसुळाट उठला आहे. त्यामुळे या तस्करीच्या प्रयत्नांच्या घटना वाढल्या आहेत. आतापर्यंत तस्करांना यश आले नाही कारण सैन्याने सुरक्षेची जबाबदारी अत्यंत चोखपणे बजावली आहे. आगामी काळातही असे अनेक प्रयत्न होण्याची शक्यता आहे. त्यासाठी भारतीय सैन्यही सज्ज आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.