न जेवताच पती झोपला म्हणून पत्नीने बॅटने हाणलं! 15 टाके पडले आणि झोप उडाली ते वेगळंच

Husband beaten up by Cricket Bat : राग पत्नीच्या इतक्या डोक्यात गेला की आपल्या पतीलाच पत्नीने बॅटने अक्षरशः सोलपटून काढला.

न जेवताच पती झोपला म्हणून पत्नीने बॅटने हाणलं! 15 टाके पडले आणि झोप उडाली ते वेगळंच
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 12:51 PM

नवरा बायकोला भांडणाला (Husband Wife Clash) कारण थोडीच लागतं, असं म्हणतात. पण शुल्लक का असेना, छोट्याशा कारणावर वाद किती मोठा होऊ शकतो, याची कल्पनाही करता येणार नाही, अशी घटना उघडकीस आली आहे. नवरा बायकोचं भांडण झालं. कारण ठरलं, नवऱ्याची झोप. अशात तुम्ही जर बायकोनं केलेलं जेवण न जेवताच झोपी जात असाल, तर ही बातमी (Husband Wife News) तुम्ही वाचलीच पाहिजे. त्याचं झालं असं, की एका बायकोनं जेवणं केलं. पण नवरा न जेवताच झोपी गेला. बायकोला आला राग. तिनं हातात घेतली क्रिकेटची बॅट (Cricket Bat)! बॅटनेच बायकोनं नवऱ्याला हाण हाण हाणलं. नवऱ्याला इतका मार बसला की तब्बल 15 टाके घालावे लागले. शिवाय झोपमोड झाली, ते वेगळंच! ही घटना घडल्यानंतर पत्नीवर पोलीस कारवाई करतील, असं कुणालाही वाटेल. पण उलटपक्षी पीडित पती आणि त्याच्या कुटुंबीयांवरच गुन्हा दाखल करत पोलिसांनी एकतर्फी कारवाई केल्याचं वृत्त समोर आलंय. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून पीडित पतीबाबत लोकांना सहानुभूती वाटू लागली आहे. त्यांनी या घटनेवर संताप व्यक्त केलाय. घटना आहे राजस्थानच्या बिकानेर येथील!

अक्षरशः सोलपटून काढला

पती जेवण न करता झोपल्याचा भयंकर राग पत्नीला आला होता. राग पत्नीच्या इतक्या डोक्यात गेला की आपल्या पतीलाच पत्नीने बॅटने अक्षरशः सोलपटून काढला. मारहाण इतकी अमानुष होती की अर्धा डझनपेक्षा जास्त काटे जखमी पतीला लावावे लागले. इतक्यावरच पत्नी थांबली नाही, एकदा तिच्या हातातली बॅट शेजारच्यांनी कशीबशी करुन सोडवली. पण गरम डोक्याच्या पत्नीनं पुन्हा एकदा बॅट हिसकावून घेत पतीवर हल्लाबोल केला. 14 जुलैला ही घटना समोर आली होती. आजतकने याबाबतचं वृत्त दिलंय.

हे सुद्धा वाचा

पोलिसांना भूमिकेवरही सवाल

आता या घटनेनंतर पोलिसांनी पीडित पती आणि त्याच्या कुटुंबीयांना आणि शेजारच्यांनाही उपदेशाचे डोस पाजत असल्याचा आरोपही केला जातोय. छेडछाड आणि धमकी दिल्याप्रकरणी आम्ही तुम्हाला अटक करु असा इशारा स्थानिक पोलिसांकडून दिला जातोय.

दरम्यान, पीडित पतीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे न्याय मागितला आहे. व्हिडीओ प्रूफ असूनही पोलिसांनी आमच्यावर केस केल्याचा आरोप पीडित पतीच्या कुटुंबीयांनी केलाय. इतकंच काय तर महिलांना मर्डर करण्याची सूट दिलीये का, असा सवासही त्यांनी उपस्थित केलाय.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.