IGI विमानतळावर हेरॉईनचा आतापर्यंतचा सर्वात मोठा साठा जप्त, ट्रॉली बॅगेत सापडले 434 कोटींचे ड्रग्ज

“डीआरआयने माल आयात करणाऱ्या व्यक्तीला पकडले आहे. इतर संशयितांचीही चौकशी केली जात आहे” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ट्रॉलीमध्ये लपवलेले अंमली पदार्थ शोधणं अत्यंत कठीण होतं असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

IGI विमानतळावर हेरॉईनचा आतापर्यंतचा सर्वात मोठा साठा जप्त, ट्रॉली बॅगेत सापडले 434 कोटींचे ड्रग्ज
हेरॉईनचा साठा जप्तImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 4:00 PM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Indira Gandhi International Airport – IGI) एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने (Directorate of Revenue Intelligence – डीआरआय) अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. 62 किलो वजनाचे हेरॉईन (Heroin Drugs) विमानतळावर हस्तगत करण्यात आले आहे. अवैध बाजारपेठेत याची किंमत 434 कोटी रुपयांच्या घरात आहे. भारतातील कुरिअर, कार्गो किंवा एअर पॅसेंजरने आलेली हेरॉईनची ही आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती मानली जाते.

काय आहे प्रकरण?

एकूण 330 बॅग आयात करण्यात येत होत्या. त्यापैकी 126 ट्रॉली बॅगच्या मेटल ट्यूबमध्ये हेरॉईन लपवण्यात आले होते. डीआरआयच्या माहितीनुसार, “ब्लॅक अँड व्हाइट” कोडनेम असलेल्या या ऑपरेशनमध्ये 55 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. युगांडातील एंटेबे येथून दुबईमार्गे हा माल दिल्लीला पोहोचला. पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये आणखी 7 किलो हेरॉईन आणि 50 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले.

“डीआरआयने माल आयात करणाऱ्या व्यक्तीला पकडले आहे. इतर संशयितांचीही चौकशी केली जात आहे” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ट्रॉलीमध्ये लपवलेले अंमली पदार्थ शोधणं अत्यंत कठीण होतं असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

देशभरात हेरॉईनचे मोठे साठे जप्त

2021 मध्ये देशभरात 3,300 किलोपेक्षा जास्त हेरॉईन जप्त करण्यात आले होते. जानेवारी 2022 पासून, डीआरआयने दिल्लीतील आयसीडी तुघलकाबाद येथील कंटेनरमधून 34 किलो, मुंद्रा बंदरातील कंटेनरमधून 205 किलो आणि पिपावाव बंदरावर 392 किलो धागे (सुतळी) यासह अनेक वेळा हेरॉईन जप्त केले आहे. गेल्या तीन महिन्यांत, विमान प्रवाशांकडून 60 किलोपेक्षा जास्त हेरॉईन जप्त करण्यात आल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

एप्रिल महिन्याच्या अखेरीस युगांडाहून आलेल्या एका महिलेला 6.65 कोटी रुपये किमतीचे हेरॉईन बाळगल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली होती. दोह्याहून आल्यानंतर महिलेला सीमा शुल्क विभागाने थांबवले होते. तिच्या सामानात काहीही सापडले नव्हते, मात्र शरीराची तपासणी केल्यानंतर 126 कॅप्सूल जप्त करण्यात आले होते. त्यात 887 ग्रॅम हेरॉईन सापडले होते.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.