भारत चंद्रावर, पण लोकं काही सुधरेना, अंधश्रद्धेपोटी सॉफ्टवेअर इंजीनिअरने लेकीचाच घेतला बळी; काय घडलं नेमकं ?

अंधश्रद्धेमुळे एक सॉफ्टवेअर इंडिनिअरने त्याच्या निरागस मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यामागचे कारण ऐकून सर्वच हादरले.

भारत चंद्रावर, पण लोकं काही सुधरेना, अंधश्रद्धेपोटी सॉफ्टवेअर इंजीनिअरने लेकीचाच घेतला बळी; काय घडलं नेमकं ?
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 3:22 PM

हैदराबाद | 25 ऑगस्ट 2023 : भारताचं यान चंद्रावर जाऊन पोहोचलंय, रोज नवनवी टेक्नॉलॉजी समोर येत आहे. मात्र असं असतानाचं काही लोकं अजूनही अंधश्रद्धांचे पालन करताना दिसत आहे. अमावस्येला होणाऱ्या गुप्त पूजा अन विधी अजूनही सुरू आहेत. याच अंधश्रद्धेमुळे एका निरागस मुलीला तिचा (small girl ) जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना (crime news) उघडकीस आली आहे.

मुलीची कुंडली खराब असल्याच्या कारणावरून वडिलांनी तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. भविष्यात मुलीला त्रास होईल या भीतीने त्याने तिचा वर्तमानच खराब केला आणि आयुष्य संपवलं. एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या या पित्याने आपल्या आठ वर्षांच्या मुलीचा पेन्सिल कटरच्या ब्लेडने गळा चिरून खून केला.

हैदराबादच्या विजयवाडा येथील रहिवासी चंद्रशेखर आणि हिमा बिंदू यांना आठ वर्षांची मुलगी होती. दोघेही आयटी कंपनीत काम करतात. पती-पत्नीमध्ये पूर्वीपासूनच भांडण सुरू होते. दरम्यान, खराब कामगिरीमुळे कंपनीने चंद्रशेखरला नोकरीवरून काढून टाकले. यासाठी त्याने पत्नीला जबाबदार धरले. दोघांमध्ये अनेकदा भांडणही झाले. त्यामुळे ती बिंदू ही मुलीसह माहेरी गेली होती.

नोकरी गमावली, पत्नीला मानले जबाबदार

त्यानंतर चंद्रशेखर हा आपल्या मुलीला भेटायला जात असे. ती एका शाळेत शिकत होती. मात्र आपल्या मुलीची कुंडली खराब असल्याने तिला भविष्यात अडचणीचा सामना करावा लागणार असल्याचे त्याला समजले. त्यानंतर घटनेच्या दिवशी (18 ऑगस्ट) तो मुलीला घेण्यासाठी शाळेत गेला आणि तिला गाडीत बसवून निघाला. काही अंतरावर जाऊन त्याने मुलीची हत्या केली. असं करून तो पत्नीलाही धडा शिकवणार होता. त्याला तिचा मानसिक छळ करायचा होता. संध्याकाळ होऊनही मुलगी घरी न आल्याने तिची आई, बिंदू हिने तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. तिने नवरा, चंद्रशेखर यालाही फोन केला, तेव्हा त्याने मुलगी आपल्याबोतच राहणार असल्याचे सांगितले. सध्या ती झोपली आहे, असंही तो म्हणाला.

कार अपघातानंतर झाला खुलासा

त्यानंतर चंद्रशेखर याने मुलीचा मृतदेह लपवण्यासाठी जागेचा शोध सुरू केला. कारमध्ये निष्पाप मुलीचा मृतदेह ठेवून तो रस्त्यावर फिरत होता. तेवढ्यात त्याचा अपघाता झाला. टायर फुटल्याने कार डिव्हायडरला धडकली. रात्री १०.३० च्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर आजूबाजूचे लोक तिथे जमा झाले. तेव्हा संशयास्पद अवस्थेती चंद्रशेखरला पाहून त्यांना संशय आला, त्याच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते.

त्यांनी आत पाहिले असता कारमध्ये एका मुलीचा मृतदेह होता. त्यानंतर लोकांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिस तातडीने तिथे पोहोचले व वडिलांचा क्रूरपणा उघड झाला. पोलिसांनी चंद्रशेखरला अटक केली असून गुन्हा दाखल करून तपास करत आहेत.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.