दुचाकीवरुन धूम स्टाईलने आले, महिलेच्या गळ्यातील दागिने खेचून पळाले !

पुण्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. धूम स्टाईलने महिलांच्या गळ्यातील दागिने लुटण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.

दुचाकीवरुन धूम स्टाईलने आले, महिलेच्या गळ्यातील दागिने खेचून पळाले !
धूम स्टाईलने महिलेचे दागिने चोरलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 9:53 AM

जुन्नर-पुणे / सुनील थिगळे : उत्तर पुणे जिल्ह्यात दुचाकीवरून येऊन महिलांवर पाळत ठेवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हे चोर डोक्यात हेलमेट घालून दुचाकीचा वापर करून दागिने खेचून पसार होतात. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे अशा चोरांना पकडणे पोलिसांसमोर एक आव्हान आहे. अशीच घटना जुन्नर शहरातील मुख्य रस्त्यावर घडली आहे. धूम स्टाईलने महिलेच्या अंगावरील दागिने चोरून चोरट्यांनी पोबारा केला आहे. भरदिवसा रस्त्यावरुन चाललेल्या महिलेच्या अंगावरील दागिने लंपास केल्याची घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे.

रस्ता ओलांडत असताना महिलेला लुटले

महिला रस्ता ओलांडत असताना चोरट्यांनी या महिलेवर पाळत ठेवली. यादरम्यान हे तरुण दुचाकीवर हेल्मेट घालून आले. महिला रस्ता ओलांडत असताना हे तरुण दुचाकीवरून आले आणि त्यांनी धूम स्टाईल चोरी केली. महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून घेत पलायन केले. या महिलेला काही समजण्याच्या आतच या चोरट्यांनी दुचाकीवरून धूम स्टाईलने पलायन केले. याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सीसीटिव्हीच्या आधारे पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.

नागपुरात जेष्ठ नागरिकाला मारहाण करत लुटले

घरात एकटे असल्याची संधी साधत जेष्ठ नागरिकाच्या घरात घुसून जेष्ठ नागरिकाला मारहाण करत लुटल्याची घटना नागपुरातील हायप्रोफाईल परिसरात घडली. वयोवृध्दाला हातपाय बांधून जखमी करत 32 लाख रुपयाचा ऐवज घेऊन पसार झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. सुरेश पोटदुखे असं जखमी वृद्धाचे नाव असून, त्यांचावर सध्या उपचार सुरू आहेत. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथकं तयार केली आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.