Kolhapur : जेवताना झालेल्या भांडणात औरवाडच्या दोघांवर कटरने हल्ला, कवठेगुलंद येथील घटना

औरवाड येथे वजीरबाबा उरूस सुरू असून गावातील दोन मुलांच्यावर हल्ला झाल्याने गावात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Kolhapur : जेवताना झालेल्या भांडणात औरवाडच्या दोघांवर कटरने हल्ला, कवठेगुलंद येथील घटना
कुरंदवाड समाधान हॉटेल हाणामारीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 5:07 PM

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) म्हटले की रांगडा बाणा. जेवढं प्रेमं तेवढीच खुन्नस ही. त्यामुळेच तेथे बऱ्याचदा छोट्या छोट्या कारणातून वाद होतात आणि त्यानंतर भांडण, हाणामारी (Violence) ही, त्यातूनच खूनही. काही अशीच काहीशी घटना येथील कुरंदवाड नजीक असणाऱ्या कवठेगुलंद येथे घडली. फक्त जेवताना झालेल्या भांडणातून दोघांवर कटरने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. ही घटना येथील समाधान हॉटेलमध्ये घडली असून सांगली, मिरज शासकीय रुग्णालयात (Sangli, Miraj Government Hospital) जखमींवर उपचार सुरू आहेत. तर अमीनमहम्मद रफिक पटेल (वय 21), ओंकार माने असे जखमींची नावे असून कुरुंदवाड पोलीसात तिघा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर औरवाड येथे कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

धक्का लागून रस्सा सांडल्याने भांडण

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, येथील समाधान हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री औरवाड इथले अमीनमहंमद रफिक पटेल, ओंकार माने तसेच संशयित आरोपी कुरुंदवाड इथले ओंकार शिकलगार, प्रकाश शिकलगार तर शेडशाळ येथील कुलदीप संतपाल हे जेवायला बसले होते. यावेळी ओंकार शिकलगार याच्या ताटाला ओंकार माने कडून धक्का लागून रस्सा सांडला. त्यावेळी माने याला ओंकार शिकलगार याने धक्का का मारलास असे विचारले. त्यावेळी पटेल, माने आणि ओंकार शिकलगार यांच्यात वाद सुरू झाला. यादरम्यान शिकलगार याने खिशातील कटर काढत दोघांना दोघांना जिवंत सोडणार नाही असे म्हणत कटर अमीनंमहंमद पटेल, ओंकार माने यांच्या पोटावर वार करून जखमी केले. तसेच आरोपी प्रकाश शिकलगार याने पाण्याच्या स्टीलच्या जगणं मारहाण केली. तसेच वाईट शिवीगाळ देखील केली. तर संशयित आरोपी कुलदीप संतपाल याने शिवीगाळ करत लाथबुक्याने मारहाण केली. यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. याबाबत स्वतः जखमी अमीनमहंमद पटेल यांनी मिरज दवाखान्यात वर्दी जबाब दिल्यावरून कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सदर घटना रात्री 12 वाजता घडल्याने औरवाड येथील तरुणवर्ग मोठ्या संख्येने हॉटेल समोर गर्दी करून होता.

हे सुद्धा वाचा

पोलीस बंदोबस्त वाढवला

तर या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्राणात आणली. तसेच तणाव आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान जखमी सांगली तसेच मिरज येथे उपचार घेत आहेत. सध्या जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे समजते या हल्याने हॉटेल व्यावसायिक सह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान औरवड येथे पोलीस बंदोबस्त वाढवला असून अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, इचलकरंजी पोलीस उपअधीक्षक बी बी महामुनी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. औरवाड येथे वजीरबाबा उरूस सुरू असून गावातील दोन मुलांच्यावर हल्ला झाल्याने गावात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.