Mumbai Crime News : मासेमारीसाठी गेलेली बोट वर्सोवा समुद्रात बुडाली, एकाने पोहत किनारा गाठला
सध्या पावसाळा सुरु असल्यामुळं समुद्रात अनेकदा मोठ्या लाठा पाहायला मिळतात. काल रात्री एक बोट बुडाली असल्याची माहिती मिळाली आहे. दोन जण बेपत्ता आहेत.
मुंबई : मुंबईत (Mumbai) पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेकांचा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाला आहे. पावसाळा असल्यामुळे पोलिस प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन मासेमारी करणाऱ्या लोकांना आणि पर्यटकांना केलं आहे. त्याचबरोबर सध्या समुद्र किनारी पोलिसांचा बंदोबस्त सुध्दा पाहायला मिळतो. काल रात्री मासेमारी करण्यासाठी गेलेली एक बोट अचानक वर्सोवा समुद्रात (varsova sea) बुडाली. त्यावेळी त्या बोटीत तीन मासेमारी होते. त्यांच्यातल्या एकाने पोहत किनारा गाठला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. बेपत्ता दोघांचा पोलिस (mumbai police) शोध घेत आहेत.
नेमकं काय झालं
काल रात्री तिघेजण वर्सोवा समुद्रात बोट घेऊन मासेमारी करण्यासाठी उतरले होते. त्यावेळी बोट अचानक बुडाली. त्यावेळी रात्रीच्या साडेनऊ वाजल्या असतील असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. ज्यावेळी ती बोट बुडाली त्यावेळी त्या बोटीत तिघेजण होते. त्याच्यातल्या एकाने कसाबसा समुद्र गाठला आणि ही घटना पोलिसांनी सांगितली.
शोध मोहिम सुरु
त्यानंतर पोलिसांनी इतर पथकांच्या मदतीने त्या दोघांचा शोध घ्यायला सुरुवात केली. रात्र असल्यामुळे त्यांना शोधण्यात रेस्क्यू पथकाला अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. उस्मानी भंडारी आणि विनोद गोयल अशी बेपत्ता झालेल्या मच्छिमारांची नावे आहेत. लाइफ गार्ड, बीएमसी आणि कोस्ट गार्डचे पथक शोध मोहीम राबवत आहेत.
वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
अद्याप दोघांचा शोध लागला नसल्याचं पथकांनी सांगितलं आहे. त्यांचा शोध सुरु असल्यामुळे वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापुर्वी सुध्दा अनेक मच्छीमारांचा बोट बुडाल्यामुळे मृत्यू झाला आहे.