अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पतीनेच काढला काटा, ‘त्या’ हत्याकांडाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश
पतीच्या कर्जदारासोबत पत्नीचे सूत जुळले. पतीला या संबंधाची माहिती मिळाली आणि पतीने याला विरोध करण्यास सुरुवात केली. यानंतर महिलेने धक्कादायक कृत्य केले.
बंगळुरु : पती अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता. त्यामुळे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची घटना बंगळुरुत उघडकीस आली आहे. अखेर पोलिसांना दक्षिण बंगळुरुत सापडलेल्या मृतदेहाबाबत उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. अरुण कुमार असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकरासह पाच जणांना अटक केली आहे. रंजिता, गणेश, शिवानंद, शरथ आणि दीपक अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलीस चौकशीत पोलिसांना मयताच्या पत्नीवर संशय आला. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला.
पोलिसांना मृतदेह आढळून आला होता
बंगळुरुतील चन्नासंद्रा येथे पीडित अरुण कुमार आपल्या कुटुंबासह राहत होता. अरुण कुमार हा हॉटेल व्यावसायिक होता. 29 जून रोजी दक्षिण बंगळुरुतील गट्टीगेरेपल्यातील एनआयसीई रोडजवळ अरुण कुमारचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरु केला. पोलिसांनी वेगात तपास करत दुसऱ्याच दिवशी मृतदेहाची ओळख पटवली.
पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
पोलिसांनी अरुण कुमारच्या पत्नीची चौकशी केली असता तिचे वर्तन संशयास्पद वाटले. पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेत कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. कुमारने गणेशकडून हॉटेल व्यावसायासाठी 8 लाख रुपये उसने घेतले होते. परंतु तो हे कर्ज फेडू शकला नाही. त्याचे व्यावसायात नुकसान झाल्याने त्याला घटनेच्या तीन आठवड्यापूर्वी हॉटेल बंद करावे लागले.
यादरम्यान रंजिताचे गणेशसोबत अनैतिक प्रेमसंबंध जुळले. याची माहिती अरुणला मिळाली आणि त्याने या संबंधाला विरोध केला. मात्र रंजिता संबंध तोडण्यास तयार नव्हती. यामुळे अरुण तिला मारहाण करु लागला. यामुळे रंजिताने गणेशच्या मदतीने अरुणचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार, 28 जून रोजी त्यांनी कुमारने अरुणला हॉटेल पुन्हा सुरू करण्यासंबंधी आर्थिक विषयांवर चर्चा करण्याच्या बहाण्याने भेटायला बोलावले.
कुमार मद्यधुंद अवस्थेत गणेशला भेटायला आला होता. मग ते ऑटोरिक्षाने गट्टीगेरेपाल्याला गेले. तेथे गणेश आणि त्याच्या मित्रांनी कुमारवर चाकूने हल्ला केला, परिणामी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. रंजिताच्या जबाबानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.