Dhule Accident : धुळ्यात नाशिक-नंदुरबार एसटीला अपघात, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

सदर एसटी नंदुरबारकडून साक्रीकडे जात होती. तर कार विरुद्ध दिशेने होती. पावसामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात कार एसटीसमोर आली.

Dhule Accident : धुळ्यात नाशिक-नंदुरबार एसटीला अपघात, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
धुळ्यात नाशिक-नंदुरबार एसटीला अपघातImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 9:33 PM

धुळे : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे धुळ्यात एसटीला अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात काही जण जखमी (Injured) झाले आहेत. धुळे जिल्ह्यातील टिटाणे फाट्याजवळ नाशिक-नंदुरबार एसटीचा अपघात झाला. समोरुन येणाऱ्या एका कारचालकाने रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या नादात कार (Car) एसटीसमोर आणली. यावेळी एसटी आणि कारमध्ये समोरासमोर धडक होणार तोच एसटी चालकाने प्रसंगावधान राखत एसटी रस्त्याच्या कडेला उतरवली. यावेळी बस रस्त्यालगत एक खड्यात उतरली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही जण जखमी झाले. तसेच एसटीचे नुकसान झाले आहे.

अपघातात एसटीचे नुकसान, काही जण किरकोळ जखमी

सदर एसटी नंदुरबारकडून साक्रीकडे जात होती. तर कार विरुद्ध दिशेने होती. पावसामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात कार एसटीसमोर आली. यावेळी एसटी आणि कारची समोरासमोर धडक होणार होती. मात्र एसटी चालकाने प्रसंगावधान राखत एसटी रस्त्याच्या कडेला उतरवली. यावेळी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात एसटी आदळली. यामुळे एसटीतील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. मात्र जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलीस आणि साक्री आगारातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातात एसटीच्या पुढच्या बाजूचा चेंदामेंदा झाला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हा अपघात झाला असून, हे खड्डे तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी आता वाहन चालकांनी केली आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील कारमधून गुटखा तस्करी होत असल्याची चर्चा आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणांकडून अद्याप याला दुजोरा मिळाला नाही. (Accident on Nashik-Nandurbar ST in Dhule, fortunately no casualties)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.