Gondia Illegal Abortion : गोंदियात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मग बेकायदेशीर गर्भपात; मुलीची प्रकृती गंभीर

आरोपी तरुण आणि पीडित अल्पवयीन मुलगी हे दोघे शेजारी शेजारीच राहतात. दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी प्रेमसंबंध जुळले. याच प्रेमसंबंधातून मुलगी गरोदर राहिली.

Gondia Illegal Abortion : गोंदियात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मग बेकायदेशीर गर्भपात; मुलीची प्रकृती गंभीर
गोंदियात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मग बेकायदेशीर गर्भपातImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 6:49 PM

गोंदिया : गोंदिया-भंडारा अत्याचाराची शाई वाळत नाही तोच गोंदिया जिल्ह्यात पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दवनीवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत उघडकीस आली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीवर 26 वर्षाच्या तरूणाने भूलथापा देत सतत लैंगिक अत्याचार (Sexual Abused) केला. यात ती अल्पवयीन मुलगी चार महिन्याची गर्भवती (Pregnant) झाली. यानंतर तरुणाने गर्भपाताच्या गोळ्या देत तिचा गर्भपात (Abortion) केला. मात्र यामुळे मुलीची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी दवनीवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी एका आरोपीला अटक केले आहे.

गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्यानंतर मुलीची प्रकृती बिघडली

आरोपी तरुण आणि पीडित अल्पवयीन मुलगी हे दोघे शेजारी शेजारीच राहतात. दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी प्रेमसंबंध जुळले. याच प्रेमसंबंधातून मुलगी गरोदर राहिली. मुलगी गरोदर राहिल्याचे कळताच आरोपी तरुणाने तिला मेडिकलमधून डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या गोळ्या खरेदी करुन दिल्या. या गोळ्या खाल्ल्यानंतर अर्धवट गर्भपात झाल्याने मुलीची प्रकृती गंभीर झाली. यानंतर तिला उपचारासाठी गोंदियातील बाई गंगाबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी तरुणाला अटक केले आहे. मुलीची प्रकृती गंभीर असून, उपचार सुरु आहेत. दरम्यान याप्रकरणी शिवसेना आक्रमक झाली असून, शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी बाई गंगाबाई रूग्णालयाला भेट देत पिडीतेची विचारपूस करीत शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. (A minor girl was abused and illegally aborted, the girls condition is critical in Gondia)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.