Jobs | 1673 पदांसाठी या सरकारी बँकेत भरती प्रक्रिया, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

Jobs | देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पगार वाचून तर तुम्ही म्हणाल लाईफ सेटल आहे..

Jobs | 1673 पदांसाठी या सरकारी बँकेत भरती प्रक्रिया, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख
बँकेत नोकरीची संधी Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 6:41 PM

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) प्रोबेशनरी ऑफिसरच्या (PO) पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. याविषयीची अधिसूचनाही बँकेने काढली आहे. SBI PO 2022 संबंधीची संपूर्ण माहिती बँकेचे अधिकृत संकेतस्थळ sbi.co.in वर उपलब्ध आहे.

उमेदवारांना ऑनलाई अर्ज करण्याची प्रक्रिया, शैक्षणिक अहर्ता, वयाची अट, शुल्क आदीची माहिती एसबीआयचे करिअर पोर्टल sbi.co.in/careers वा ibpsonline.ibps.in वर मिळेल. तसेच याच ठिकाणी त्यांना अर्ज ही करता येईल.

एकूण 1673 PO पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यामध्ये 1600 नियमीत पदे तर 73 पदांचा बॅकलॉग भरण्यात येणार आहे. त्यामुळे या पदासाठी तयारी करा.

हे सुद्धा वाचा

SBI PO 2022 भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे उमेदवारही अर्ज करु शकतात.

परंतु, मुलाखतीवेळी त्यांनी 31 डिसेंबर 2022 पूर्वी पदवीची परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. त्यासंबंधीचा पुरावा त्यांनी सादर करणे आवश्यक आहे.

उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2022 रोजीपर्यंत 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. वयातील सवलत सरकारच्या नियमानुसार लागू आहे.

अर्ज शुल्क सामान्य / ईडब्ल्यूएस / ओबीसी उमेदवारांसाठी 750 रुपये आहे. तर एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी उमेदवारांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. एकदा जमा केलेले शुल्क परत केले जाणार नाही.

ज्युनिअर मॅनेजमेंट ग्रेड स्केल- I लागू असेल 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840 वेतन स्केल असेल. सुरुवातीचे बेसिक वेतन 41,960/- (4 अग्रिम वेतन वृद्धि सह)असेल. तसेच इतर अनुषांगिक लाभ व भत्ते मिळतील.

SBI PO 2022: महत्वाची तारीख

ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया आज 22 सप्टेंबरपासून सुरु झाली अर्ज करण्याची अंतिम तारीख- 12 ऑक्टोबर 2022 अर्जात दुरुस्ती करण्याची अंतिम तारीख- 12 ऑक्टोबर 2022 अर्जाची प्रिंटआउट काढण्याची अंतिम तारीख- 27 ऑक्टोबर 2022 ऑनलाईन शुल्क भरण्याची तारीख – 22 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर 2022

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.