Nashik ZP Recruitment 2023 : नाशिक जिल्हा परिषदेमध्ये ‘या’ जागांसाठी भरती, या तारखेपर्यंत भरा अर्ज!
Zila Parishad Mega Bharti 2023: राज्यातील जिल्हा परिषदेतील मेगा भरतीला सुरुवात झाली आहे. 19,460 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. नाशिक जिल्हा परिषदेची भरतीसाठी अर्ज भरणे सुरु झाले आहे.
नाशिक : राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील भरती प्रक्रियेची जाहिरात निघाली आहे. मेगा भरती असून 19,460 जागांची भरती प्रकिया होणार आहे. नाशिक जिल्हा परिषदेमध्ये यातील 1038 जागांची भरती होणार आहे. 25 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारीच यासंदर्भात माहिती दिली होती.
ऑनलाईन पद्धतीने 5 ऑगस्टपासून अर्ज करता येणार असून 25 ऑगस्ट ही अंतिम तारीख असणार आहे. या परीक्षेसाठीचे उमेदवारांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस आधी मिळणार आहे. या पराक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 आणि मागासवर्गीय उमेदवारासांठी 18 ते 43 इतकी असणार आहे. तर दरमहा वेतन हे 19,900 ते 1,12,400 इतका असणार आहे.
नाशिक जिल्हा परिषदेमध्ये या जागांसाठी भरती
Gramsevak (Contractual) / (कंत्राटी) ग्रामसेवक – ५० Health Supervisor / आरोग्य पर्यवेक्षक – ३ Auxilary Nurse Midwife [Health Worker (Female)] / आरोग्य परिचारिका [आरोग्य सेवक (महिला)] – ५९७ Health Worker(Male) / आरोग्य सेवक (पुरुष) ४०% – ८५ Health Worker (Male) (Seasonal Spraying Field Worker) /आरोग्य सेवक (पुरुष) (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) ५०% – १२६ औषध निर्माण अधिकारी – २० प्रयोगशाळा तंत्रज्ञ -१४ विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – २ Extension Officer (Education) Class ३ Grade २ / विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग ३ श्रेणी २) – ८ Senior Assistant / वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) – ३ Live Stock Supervisor / पशुधन पर्यवेक्षक – २८ Junior Draftsman / कनिष्ठ आरेखक – २ कनिष्ठ लेखा अधिकारी – १ Junior Assistant (Accounts) / कनिष्ठ सहाय्यक (लेखा) -५ Junior Assistant / कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) -२२ Supervisor / (मुख्य सेवीका / पर्यवेक्षिका) – ४ / कनिष्ठ यांत्रिकी – १ Junior Engineer (Civil / Rural Water Supply) / कनिष्ठ अभियंता (स्थापत्थे / ग्रा.पा.पु.) – ३४ Civil Engineering Assistant (Civil / Minor Irrigation) / स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (स्थापत्य) इवद -३३ Stenographer (Higher Grade) / लघुलेखक (उच्च श्रेणी) – १ एकुण – १०३८
कसा करावा अर्ज
- जिल्हा परिषदेतील भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावरुन अर्ज करावे लागणार आहे.
- अर्ज करण्यासाठी आधी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.
- ५ ते २५ ऑगस्टपर्यंत हा अर्ज करता येणार आहे. याच कालवधीत परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.