Chandrapur ZP Recruitment 2023 : चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये तब्बल इतक्या जागांची भरती, जाणून घ्या सर्व माहिती!
Chandrapur Zilha Parishad Recruitment 2023 : चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकूण 320 जागांसाठी भरती होणार आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी प्रक्रिया शनिवारपासून सुरुवात झाली. चंद्रपूर जिल्हा परिषदेत 320 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
चंद्रपूर : राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील भरती प्रक्रियेची जाहिरात निघाली आहे. मेगा भरती असून 19,460 जागांची भरती प्रकिया होणार आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये यातील 519 जागांची भरती होणार आहे. 25 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारीच यासंदर्भात माहिती दिली होती.
ऑनलाईन पद्धतीने 5 ऑगस्टपासून अर्ज करता येणार असून 25 ऑगस्ट ही अंतिम तारीख असणार आहे. या परीक्षेसाठीचे उमेदवारांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस आधी मिळणार आहे. या पराक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 आणि मागासवर्गीय उमेदवारासांठी 18 ते 43 इतकी असणार आहे. तर दरमहा वेतन हे 19,900 ते 1,12,400 इतका असणार आहे. हा फॉर्म भरताना खुल्या वर्गासाठी 1000 रूपये तर मागासवर्गीयांसाठी 900 रूपये इतकं आहे.
खालील पदांसाठी जागा रिक्त
आरोग्य पर्यवेक्षक – १ आरोग्य सेवक (पुरुष) 40% – २५ आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) – ४२ आरोग्य परिचारिका आरोग्य सेवक (महिला) – २३९ औषध निर्माण अधिकारी – २० कंत्राटी ग्रामसेवक – ६४ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बोधकाम / प्रामीण पाणी पुरवठा) – ३९ कनिष्ठ आरेखक – २ कनिष्ठ लेखा अधिकारी – २ कनिष्ठ सहाय्यक – २१ कनिष्ठ सहाय्यक लेखा – ८ तारतंत्री – १ मुख्य सेविका/पर्यवेक्षिका – ७ पशुधन पर्यवेक्षक – १७ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ४ रिगमन (दोरखंडवाला) – १ लघुलेखक (निम्न श्रेणी) – १ वरिष्ठ सहाय्यक लेखा – ४ विस्तार अधिकारी (कृषि) – २ विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग3 श्रेणी2) – ९ विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – १ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघु पाटबंधारे) – ९ एकूण – ५१९
कसा करावा अर्ज
- जिल्हा परिषदेतील भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावरुन अर्ज करावे लागणार आहे.
- अर्ज करण्यासाठी आधी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.
- ५ ते २५ ऑगस्टपर्यंत हा अर्ज करता येणार आहे. याच कालवधीत परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.