Bernard Arnault : एलॉन मस्क यांना धोबीपछाड देणारे बर्नार्ड अर्नाल्ट आहे तरी कोण? त्यांचा व्यवसाय तरी काय? उत्तर एका क्लिकवर..

Bernard Arnault : जगातील सर्वात श्रीमंत बर्नार्ड अर्नाल्ट यांचा व्यवसाय तरी काय..

Bernard Arnault : एलॉन मस्क यांना धोबीपछाड देणारे बर्नार्ड अर्नाल्ट आहे तरी कोण? त्यांचा व्यवसाय तरी काय? उत्तर एका क्लिकवर..
जगातील सर्वात श्रीमंतImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 14, 2022 | 8:39 PM

नवी दिल्ली : एलॉन मस्क (Elon Musk) यांना धोबीपछाड देत बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnault) हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. जगातील टॉप-10 अरबपतींमध्ये (Top-10 Billionaires) अर्नाल्ट यांनी पहिला क्रमांक मिळविला. गेल्या अनेक दिवसांपासून ते या यादीत दुसऱ्या स्थानावर होते. 2021 पासून मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. पण ट्विटरच्या मालकीनंतर मस्क पहिल्या क्रमांकावरुन पायउतार झाले. दुसऱ्या क्रमांकावरील अर्नाल्ट यांनी शेवटी बाजी मारली.

Forbes’s च्या रिअल टाईम बिलेनियर्स इंडेक्सनुसार, मुळचे फ्रांसचे असलेल्या Bernard Arnault यांची एकूण संपत्ती 188.6 अब्ज डॉलर आहे. ते जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी आले आहेत. गेल्या 24 तासात त्यांच्या संपत्तीत 2.7 टक्क्यांची वाढ झाली आहे.

ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांच्या एकूण संपत्तीत घट झाली आहे. त्यांच्या संपत्ती घट होऊन ती 176.8 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावरुन मस्क आता दुसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले आहेत.

हे सुद्धा वाचा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Bernard Arnault यांची कंपनी लक्झरी पर्स तयार करते. या कंपनीचे नाव Louis Vuitton असे आहे. त्या कंपनीची मालकी असलेल्या LVMH चे मालक अर्नाल्ट आहेत. LVMH हा समूह जवळपास 60 सहायक कंपन्यांचे नियंत्रण करतो. या समूहाचे 75 ब्रँड बाजारात आहेत.

कंपनीच्या ब्रँड लिस्टमध्ये Louis Vuitton, Christian Dior, Fendi, Givenchy, Marc Jacobs, stella McCartney, Sephora, Princess Yachts, Bulgari आदींचा समावेश आहे.  यासोबतच त्यांचे इतर ही अनेक ब्रँड आहेत. ही उत्पादने लोकप्रिय आहेत.

Bernard Arnault यांचा जन्म 5 मार्च 1949 मध्ये झाला. ते सध्या 73 वर्षांचे आहेत. त्यांच्या वडिलांकडून त्यांनी व्यावसायिक गुण घेतले. 1971 साली त्यांनी पदवी मिळवली आणि वडिलांच्या व्यवसायात त्यांनी सहभाग घ्यायला सुरुवात केली.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.