Average Salary : बांधा बरं अंदाज, कोणत्या राज्यात मिळतो अधिक पगार

Average Salary : देशात काही कंपन्यांमध्ये लाखच नाही तर कोट्यवधी रुपयांचे पॅकेज घेणारे अनेक जण आहेत. पण सरासरी पगारात कोणते राज्य अव्वल आहे, महाराष्ट्राचा नंबर कितवा..

Average Salary : बांधा बरं अंदाज, कोणत्या राज्यात मिळतो अधिक पगार
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 4:22 PM

नवी दिल्ली : नोकरी (Jobs) मिळण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरु असते. आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे आयटी, डेटा सेक्टरमध्ये सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्या मिळत आहे. आयटी हबमधील तरुणांच्या पगाराचे आकडे ऐकून थक्क झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक सेक्टरमध्ये वरीष्ठ पदावरील व्यक्तीला चांगला पगार मिळतो. शेवटी पोटासाठी सर्व कसरत सुरु असते. त्यामुळे अनेक जण चांगल्या म्हणजे सर्वाधिक वेतन देणाऱ्या नोकरीच्या शोधात असतात. एकदा अनुभव गाठिशी आला की सुरुवातीच्या काळात पगार वाढीसाठी नोकरी बदलण्याची, बिऱ्हाड पाठीवर घेऊन फिरण्याची कसरत करावी लागते. पण भारतात सर्वाधिक सरासरी पगार (Highest Average Salary) कोणत्या राज्यात मिळतो माहिती आहे का? तुम्हाला महाराष्ट्र वाटत असेल तर हा अंदाज चुकीचा आहे. मग कोणते राज्य अव्वल आहे..

काय म्हणतो अहवाल स्टेटिस्टा या संस्थेने देशातील सर्वाधिक सरासरी मासिक वेतन देणाऱ्या राज्यांची एक यादी तयार केली आहे. या रिपोर्टपूर्वी गेल्या वर्षी अनेकांनी नोंदवलेले अंदाज साफ चुकले होते. महाराष्ट्र हे आघाडीचे औद्योगिक राज्य असल्याने देशात सर्वाधिक सरासरी वेतन देणारे हेच राज्य असेल, असे अनेकांना वाटत होते. पण या यादीत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर नाही. टीव्ही9 मराठी या अहवालाची कुठले पुष्टीकरण करत नाही.

पहिली तीन राज्य या यादीत पहिले स्थान उत्तर प्रदेश सरकारने पटकावले आहे. येथील एका व्यक्तीचे सरासरी मासिक वेतन 20,730 रुपये आहे. देशात सर्वाधिक सरासरी मासिक वेतन देणारे हे पहिले राज्य ठरले आहे. दुसऱ्या स्थानावर पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. येथील वेतनदार 20,210 रुपये सरासरी मासिक वेतन घेतो. पश्चिम बंगालमध्ये फार मोठे उद्योग नसताना पण या यादीत पश्चिम बंगालने दुसरे स्थान पटकावले आहे. तिसऱ्या स्थानावर महाराष्ट्र राज्य आहे. येथील पगारदाराला 20,011 रुपये सरासरी मासिक वेतन मिळते. येथे बॉलिवूड, आयटी पार्क, मुंबईसारखी आर्थिक राजधानी, अनेक उद्योग व्यवसाय, कारखानदारी असताना ही राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हे सुद्धा वाचा

इतर राज्य कोणती चौथ्या क्रमांकावर बिहार राज्य येते. बिहारमधू सर्वाधिक ब्रेन ड्रेन म्हणजे स्थलांतरीत कुशल-अकुशल कामगार येतात. ते रोजगाराच्या शोधासाठी राज्यबाहेर पडतात. या राज्यात उद्योग धंदे अत्यंत कमी आहे. या राज्यात सरासरी मासिक वेतन 19,960 रुपये आहे. पाचव्या स्थानावर राजस्थान आहे. येथील सरासरी मासिक पगार 19,740 रुपये आहे. या यादीत मध्यप्रदेश सहाव्या स्थानावर आहे. राजस्थान इतकेच येथील लोकांचे सरासरी मासिक उत्पन्न आहे.

शेवटचे खेळाडू कोण या यादीत सातव्या स्थानावर तामिळनाडू आहे. येथे औद्योगिक विकास चांगला आहे. येथील कर्मचाऱ्याचे सरासरी मासिक वेतन 19,600 रुपये आहे. कर्नाटक या यादीत आठव्या स्थानावर आहे. येथील कामगारांना 19,150 रुपये सरासरी मासिक वेतन मिळते.

गुजरात कुठे सध्या सर्वाधिक गुंतवणूक ज्या राज्याकडे वळविण्यात आली आहे, ते गुजरात या यादीत 9 व्या स्थानावर आहे. येथील कर्मचारी, कामगाराला 18,880 रुपये सरासरी मासिक वेतन मिळते. तर दहाव्या क्रमांकावर ओडिशा हे राज्य आहे. या राज्यातील कामगारांचे सरासरी मासिक उत्पन्न 18,790 रुपये आहे. टॉप-टॉप-10 मध्ये देशाची राजधानी दिल्लीचा क्रमांक नाही. दिल्ली 19 व्या क्रमांकावर आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.