एका वर्षात कोणी दिला दणक्यात परतावा; सोने,चांदी, एफडी, शेअर बाजार की बिटकॉईन? तुमचा पैसा वाढला कोठे?

आर्थिक स्वातंत्र्यासाठी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. सोने, चांदी, एफडी, बिटकॉईन आणि शेअर बाजार यापैकी कोणत्या पर्यायाने तुम्हाला सर्वाधिक परतावा दिला. कोणी तुमचा पैसा वाढवला, याची माहिती घेऊयात.

एका वर्षात कोणी दिला दणक्यात परतावा; सोने,चांदी, एफडी, शेअर बाजार की बिटकॉईन? तुमचा पैसा वाढला कोठे?
किती वाढला तुमचा पैसा?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 2:49 PM

आर्थिक स्वातंत्र्यासारखे जीवनात दुसरे सूख नाही. त्यामुळे गुंतवणुकीचा कोणत्या पर्यायाने (Investment option) तुम्हाला मालामाल केले. कोणता पर्याय तुम्हाला फायदेशीर ठरतो. ते पाहुयात. जर तुम्हाला आय़ुष्यात आर्थिक अडचणींचा सामाना करायचा नसेल आणि खर्च आटोक्यात आणायचा असेल तर तारुण्यातच बचतीची सवय(saving habits) सर्वात फायदेशीर ठरते. याहुनही सर्वात महत्वाची गोष्ट ठरते ती, गुंतवणुकीच्या पर्यायाची. कोणता पर्याय तुम्हाला फायदा करुन देतो, ते ही महत्वाचे आहे. मुदत ठेव (FD) आणि अल्पबचत योजना (Small savings scheme) या सुरक्षित आणि परंपरागत गुंतवणुकीचे पर्याय आहेत. तर शेअर बाजार (Share market) आणि म्युच्युअल फंड (mutual fund) थोडे जोखमीचे पर्याय आहेत. तर क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrencies) सारखे नवे पर्याय कोणत्याही नियमनाशिवाय सुरु असल्याने अत्यंत जोखमीचे आहे. त्यामुळे सोने(Gold), चांदी(Silver), निफ्टी(Nifty50) आणि बिटकॉईन(Bitcoin) यापैकी एका वर्षात कोणत्या पर्यायाने एका वर्षात सर्वाधिक परतावा(Big Return) दिला, याची माहिती घेऊयात. यामुळे तुम्हाला गुंतवणूक करताना योग्य तो पर्याय निवडण्यास मदत होईल.

निफ्टी 50 ने एका वर्षात दिला असा परतावा

निफ्टी 50 ने भारतीय शेअर बाजारातील महत्वाचा निर्देशांक आहे. यामध्ये 50 महत्वाच्या कंपन्यांचा समावेश झाला आहे. अर्थात या 50 कंपन्यांचे हा निर्देशांक प्रतिनिधित्व करतो. कोरोना महामारीमुळे बाजाराची स्थिती नाजूक होती. 3 एप्रिल 2020 रोजी निफ्टीने 8,083 अंकांचा टप्पा गाठला होता. तर त्यानंतर 15 जून 2021 रोजी निफ्टीने 15,869 अंकांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर त्यात सातत्याने चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या वर्षाचा आढावा घेतला तर निफ्टीत 143 अंकांची घसरण दिसून आली आहे. शेअर बाजाराचा बेंचमार्क असतानाही शेअर बाजाराने काही खास परतावा दिलेला नाही. उलट गुंतवणुकदारांना नुकसान सहन करावे लागले आहे. जर एखाद्याने निफ्टीतील कंपन्यांमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे मूल्य आज 99,100 रुपये झाले असते. म्हणजे 900 रुपयांचा तोटा झाला असता.

हे सुद्धा वाचा

बिटकॉईनचा तगडा झटका

बिटकॉईन 20 नोव्हेंबर 2015 रोजी पासून व्यापार करत आहेत. त्यावेळी बिटकॉईनची किंमत 21,598 रुपये होती. बिटकॉईनचे 12 नोव्हेंबर 2021 रोजीचे मूल्य 47,87,818 इतके होते. एका वर्षांपूर्वींच्या किंमतीचा आढावा घेतला असता, एक बिटकॉईन 15 जून 2021 रोजी 29, 51,637 रुपयांना मिळत होता. आज बिटकॉईनची किंमत 16,53,538 रुपये इतकी आहे. याचा सरळ अर्थ असा की, बिटकॉईनची किंमत वर्षभरात 12,98,099 रुपयांनी घटून 16,53,538 रुपयांवर आली आहे. एका वर्षात गुंतवणुकदारांना बिटकॉईनमध्ये 43.97 टक्क्यांचे नुकसान झाले आहे. एका वर्षांपूर्वी गुंतवलेल्या एक लाखांचे आता 56 हजार 30 रुपये एवढे राहिले आहे.

सोन्यातील परतावा सकारात्मक

गेल्या वर्षभरात सोन्याने सकारात्मक परतावा दिला आहे. दिल्लीचा विचार करता, 15 जून 2021 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,210 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. आता त्याची किंमत 52,115 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. म्हणजे सोन्याने एका वर्षात 3.79 टक्क्यांचा परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने एक वर्षापूर्वी सोन्यात एक लाखांची गुंतवणूक केली असती तर आज त्यात वाढ होऊन ती एक लाख 3 हजार 790 रुपये झाली असती.

चांदीने तोंडचे पाणी पळवले

तर चांदीने गुंतवणुकदारांच्या जीवाला घोर लावलेला आहे. चांदीच्या किंमती गेल्यावर्षी 67,900 रुपये प्रति किलोग्रॅम होती. आता ही किंमत घटून 59,874 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. म्हणजेच एका वर्षात चांदीत किलोमागे 8,026 रुपयांची घट झाली आहे. गुंतवणुकदारांना 11.82 टक्के इतके नुकसान सहन करावे लागेल आहे.

एफडीतील परतावा दिलासादायक

मुदत ठेवीत जोखीम कमी असल्याने त्यातील परतावा चांगलाच मिळतो. जर आपण एफडीवर विविध बँका आणि वित्तीय संस्थांचे अंदाजे 5 टक्के किंमतींचा विचार केला तर गुंतवणुकदारांना तेवढा फायदा मिळाला आहे. म्हणजे एक वर्षापूर्वी एक लाख गुंतवल्यास आता त्याचे एक लाख 5 हजार रुपये झाले असते.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.