EPS Certificate : Job बदलताय? मग हे काम करायला बिलकूल विसरु नका, जरुर मिळवा हे प्रमाणपत्र

EPS Certificate : नोकरी बदलत असाल तर हे प्रमाणपत्र ठरेल महत्वाचे..

EPS Certificate : Job बदलताय? मग हे काम करायला बिलकूल विसरु नका, जरुर मिळवा हे प्रमाणपत्र
हे प्रमाणपत्र मिळवाचImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 16, 2022 | 11:03 PM

नवी दिल्ली : दरवर्षी अनेक कर्मचारी चांगल्या पगारासाठी नोकरी बदलतात. कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) खाते असते. त्यात भविष्य निर्वाह निधी योजना (EPF) आणि कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) त्यांचा आणि कंपनीचा हिस्सा जमा होतो. त्यामुळे जुन्या ईपीएफच्या खात्यातून नवीन कंपनीत रुजू होताना ही रक्कम हस्तांतरीत करण्याचे लक्ष ठेवा. बऱ्याच कर्मचाऱ्यांना हे माहिती नसते की, त्यांना ईपीएफओकडून EPS प्रमाणपत्र (EPS Certificate) घ्यायचे असते.

ईपीएफ कायद्यानुसार, नोकरी सोडताना वा ईपीएफ योजनेतून बाहेर पडताना कर्मचाऱ्याने ईपीएस प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. परंतु, कर्मचारी या नियमाचे कसोशिने पालन करत नाहीत. ईपीएस प्रमाणपत्राचा वापर कशासाठी आवश्यक आहे, हे पाहणे आवश्यक आहे.

ईपीएस प्रमाणपत्रामुळे कर्मचाऱ्याचा त्या कंपनीतील कार्यकाळाची माहिती मिळते. त्याच्या सेवेचा कालावधी कळतो. त्याच्या सेवेचा तो रेकॉर्ड असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ईपीएस स्कीम सर्टिफिकेट मिळविणे आवश्यक असल्याचे मानण्यात येते.

हे सुद्धा वाचा

जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी बदलली. नवीन ठिकाणी जॉब करताना, त्याला ईपीएफ स्कीमची सुविधा मिळाली नाही. तर त्याला जुन्या ईपीएफ खात्याशी संबंधित निवृत्ती योजनेचे प्रमाणपत्र मिळेल. निवृत्तीवरील दाव्यासाठी हे प्रमाणपत्र उपयोगी पडेल.

ईपीएस प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. घरबसल्याही तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळविता येते. यासाठी तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया करता येते. ईपीएफ सदस्य, अधिकृत पोर्टलवर जाऊन ईपीएस स्कीम सर्टिफिकेटसाठी अर्ज करु शकतो.

      • स्टेप 1: सर्वात अगोदर, UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आणि पासवर्डचा वापर करुन लॉग-इन करा.
      • स्टेप 2: त्यानंतर, मेन्यूमध्ये ऑनलाइन सेवावर क्लिक करा. याठिकाणी क्लेम (फॉर्म – 31, 19 आणि 10C) हा पर्याय निवडा
      • स्टेप 3: EPFO रेकॉर्डमध्ये तुमचा नोंदणीकृत बँक क्रमांक नोंदवा आणि त्याचा पडताळा करा. यानंतर तुम्हाला प्रमाणपत्रावर क्लिक करुन यस हा पर्याय निवडावा लागेल.
      • स्टेप 4: “I want to apply for” हा पर्याय निवडा. “only pension withdrawal (Form 10C)” वर क्लिक करा
      • स्टेप 5: ईपीएफओ रेकॉर्डमध्ये तुमचा पत्ता नोंदवा. डिस्कलेमर वर क्लिक करा. आधार कार्डच्या माध्यमातून ओटीपी मिळवा.
      • स्टेप 6: आता ओटीपीची नोंद करा. त्याचा पडताळा करा. त्यानंतर अर्ज जमा करा.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.