Unicorn Zepto : दोस्तांची ‘दुनियादारी’! मिळाली या वर्षातील पहिली युनिकॉर्न कंपनी

Unicorn Zepto : यंदाची 2023 मधील पहिली युनिकॉर्न कंपनी तयार झाली आहे. या कंपनीचे मूल्य 1.4 अब्ज डॉलर इतकी आहे. दोन मित्रांनी मिळून दोन वर्षांपूर्वी 2021 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. घरोघरी किराणा पोहचविण्याच्या आयडियाने ही कंपनी उभी केली होती.

Unicorn Zepto : दोस्तांची 'दुनियादारी'! मिळाली या वर्षातील पहिली युनिकॉर्न कंपनी
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 5:39 PM

नवी दिल्ली | 25 ऑगस्ट 2023 : ऑनलाईन ग्रोसरी डिलिव्हरी स्टार्टअप झेप्टोने (Zepto) मोठा करिष्मा करुन दाखवली. या कंपनीने या वर्षातील सर्वात मोठा किताब मिळवला. ही 2023 मधील पहिली युनिकॉर्न कंपनी ठरली आहे. या कंपनीचे भांडवल 1.4 अब्ज डॉलरवर पोहचले आहे. या कंपनीने ई-फंडिंगच्या सहायाने 200 दशलक्ष डॉलर म्हणजे 16,528,330,800 रुपये जमवले आहे. भारताच्या या स्टार्टअपमध्ये अमेरिकेतील खासगी गुंतवणूक संस्था स्टेपस्टोन ग्रुपने (Stepstone Group) मोठी गुंतवणूक केली आहे. स्टेपस्टोन ग्रुपने पहिल्यांदाच एखादा भारतीय कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे. एका अंदाजानुसार, 2025 पर्यंत 250 युनिकॉर्न, आता 100 पेक्षा थोडे अधिक आणि 2023 पर्यंत एकूण 180 अब्ज डॉलर निधीसह, भारताची स्टार्टअप इकोसिस्टम चांगल्या स्थितीत आहे. यामध्ये आणखी वाढीची शक्यता आहे. आता झेप्टो बाजारात आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे.

गुंतवणूकदारांनी दुप्पट केली गुंतवणूक

कॅलिफोर्नियामधील कंझ्युमर फोकस्ड वेंचर कॅपिटल फर्म गुडवॉटर कॅपिटलने पण या कंपनीत गुंतवणूक केली आहे. सध्या या कंपनीत नेक्सस व्हेंचर पार्टनर्स, ग्लेड ब्रुक कॅपिटल, लकी ग्रुम आणि इतर गुंतवणूकदारांनी Zepto मधील गुंतवणूक दुप्पट केली आहे.

हे सुद्धा वाचा

आदित पालिचा-कैवल्य वोहरा यांनी केली सुरुवात

एप्रिल 2021 मध्ये Zepto ची सुरुवात झाली. कंपनी स्थापन झाल्याच्या एकाच महिन्यात या स्टार्टअपला 200 दशलक्ष डॉलरची मदत मिळाली. वर्ष 2022 मध्ये कंपनीचे बाजार मूल्य 900 दशलक्ष डॉलरवर पोहचले. आज Zepto ने त्यापुढे झेप घेतली आहे. या कंपनीची घौडदौड कायम राहिली. त्यामुळे कंपनीला युनिकॉर्नचा दर्जा मिळाला.1 अब्ज डॉलरपेक्षा अधिक बाजार मूल्य असलेल्या या कंपनीला युनिकॉर्न असे म्हणतात.

काय करते झेप्टो

कैवल्य वोहरा आणि आदित्य पालिचा या दोघांनी मिळून Zepto ची सुरुवात केली आहे. दोघेही वर्गमित्र आहेत. देशभरात Zeptoने 6,000 हून अधिक किरणा दुकानदारांच्या मदतीने अवघ्या 10 मिनिटात किराणा सामानाची डिलिव्हरी करण्याचा दावा केला आहे. अनेक कंपन्या झेप्टोच्या या संकल्पनेवर काम करत आहे. झेप्टो इतर उत्पादन सेवांवर पण लक्ष केंद्रीत करत आहे. झेप्टोने 2021 मध्ये 86 किराणा दुकानदारांसोबत करार केला. 10 लाख किराणा सामानाची कंपनीने डिलिव्हरी केली होती. कंपनी सध्या दिल्ली, चेन्नई, गुडगाव, बेंगळुरु आणि मुंबईत किराणा सामानाची घरपोच सेवा देत आहे.

स्टार्टअपचे पाहिले स्वप्न

आदित पालिचा हा मुळचा मुंबईकर. त्याने कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पदवी पूर्ण केली आहे. तो अमेरिकेतील स्टँडफोर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी गेला. पण स्वतःचा स्टार्ट अप असावा या जिद्दीने त्याला शिक्षण मध्येच सोडावे लागले. सुरुवातीला GoPool नावाने त्याने स्टार्टअप सुरु केला. पण ही योजना पूर्ण झाली नाही.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.