Twitter एका हाताने घेणार अन् दुसऱ्या हाताने देणारही, नवे बदल काय काय?
ब्लू टिक म्हणजे ट्विटरने संबंधित अकाउंट व्हेरिफाय केलेलं असतं. आता या युझर्सला किंवा कंटेंट क्रिएटर्सला महिन्याला रिवॉर्ड दिले जातील, अशी घोषणाही मस्क यांनी केली आहे.
नवी दिल्लीः ब्लू टिक (Blue Tick) यूझर्सकडून महिन्याला 8 डॉलर म्हणजेच सुमारे 660 रुपये वसूल करण्याची घोषणा एलॉन मस्क यांनी केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून मस्क यांच्यावर जोरदार टीका होत आहे. ट्विटर ही सोशल मीडिया साइट असूनही त्यावर 8 डॉलरचा खर्च भरमसाठ आहे, असे म्हटले जात आहे. त्यानंतर एलॉन मस्क यांच्याकडून सारवासरव केली जात आहे. त्यातच त्यांनी आणखी एक समाधानकारक घोषणा केली आहे.
एका हाताने द्या, एका हाताने घ्या, ही पॉलिसी एलॉन मस्क यांनी जाहीर केली आहे. एका ट्विटद्वारे ते म्हणाले, कंटेंट पब्लिशर्सना कमाई करण्याची संधीदेखील ट्विटरद्वारे दिली जाईल.
जे लोक कंटेंट देतात. उदा. न्यूज चॅनल, न्यूज वेबसाइट किंवा इन्फ्लूएंसर्सचे कंटेंट किंवा व्हिडिओद्वारे होणाऱ्या कमाईद्वारे त्यांना कमाई करता येईल.
नव्या धोरणांनुसार, ट्विटरच्या ब्लू टिक यूझर्सचे रिप्लाय, सर्च आणि मेंशनमध्ये प्राधान्य यांना प्राधान्य दिले जाईल. यासह ट्विटरवर दीर्घ व्हिडिओ आणि ऑडिओ पोस्ट करता येतील. तसेच ट्विटरवर टेक्स्ट पोस्ट करण्याची शब्दमर्यादादेखील वाढवली जाईल.
एलॉन मस्क यांनी म्हटलेय की, ब्लू टिक धारक यूझर्सना पूर्वीपेक्षा कमी जाहिराती दिसतील.
Twitter’s current lords & peasants system for who has or doesn’t have a blue checkmark is bullshit.
Power to the people! Blue for $8/month.
— Elon Musk (@elonmusk) November 1, 2022
ज्या अकाउंटवरून उत्तम कंटेंट पल्बिश केला जातो. उदा. न्यूज ऑर्गनाझेशन यासाठी वेगळी पॉलिसी आणली जाईल. म्हणजेच या संस्थांची कमाई होऊ शकेल. ट्विटरवर सरकार, बातम्या, मनोरंजन किंवा इतर काही खास विषय डेझिग्नेटेड कॅटेगरीत शामिल आहेत.
थोडक्यात सांगायचं तर ते न्यूज चॅनल आणि इतर कंटेंट क्रिएटर्सना आता प्लॅटफॉर्मकडून पैसे कमावण्याची संधी मिळेल. युरोपियन देशांत गूगलसहित इतर अनेक प्लॅटफॉर्मवर कंटेंट क्रिएटर्सना पैसे कमावण्याची संधी देतात.
ब्लू टिक म्हणजे ट्विटरने संबंधित अकाउंट व्हेरिफाय केलेलं असतं. आता या युझर्सला किंवा कंटेंट क्रिएटर्सला महिन्याला रिवॉर्ड दिले जातील, अशी घोषणाही मस्क यांनी केली आहे. तसेच पेवॉलच्या माध्यमातून पब्लिशर्सना काम करण्याची संधी मिळेल अशी घोषणाही एलॉन मस्क यांनी केली आहे.