Tomato High Prices : टोमॅटोला महागाईच्या झोक्यातून उतरवणार, जनतेला दिलासा मिळणार

Tomato High Prices : टोमॅटोला महागाईच्या झोक्यातून उतरविण्याचा मास्टरप्लॅन तयार करण्यात आला आहे. तर पावसाचे चक्र फिरल्यास केंद्र सरकारला आणि जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. काय घडतय पडद्यामागे

Tomato High Prices : टोमॅटोला महागाईच्या झोक्यातून उतरवणार, जनतेला दिलासा मिळणार
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 3:52 PM

नवी दिल्ली : उत्तर भारतात पावसाने हाहाकार माजवला आहे. याठिकाणी पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. देशात टोमॅटोचे भाव (Tomato Price Hike) आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने मास्टरप्लॅन तयार केला आहे. लवकरच टोमॅटोच्या किंमती घसरण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (National Agricultural Cooperative Marketing Federation) म्हणजेच नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक संस्थेची मदत घेतली आहे. या संस्थांच्या माध्यमातून अगोदर दिल्ली-एनसीआर परिसरात ग्राहक विक्री केंद्राच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हा प्रयोग देशभर लागू करण्याची योजना आहे. काय आहे ही योजना, त्याचा जनतेला किती फायदा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतकी झाली दरवाढ केंद्र सरकारच्या आकड्यानुसार, गेल्या एका महिन्यात टोमॅटोच्या किंमतीत 326.13 टक्क्यांची वाढ झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे उत्तर भारतात भाजीपाल्याच्या किंमती, विशेषतः टोमॅटोच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. उत्तर भारतातील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रांची मदत घेण्यात येणार आहे.

दक्षिणेतील राज्यांवर भरवसा सध्या दक्षिणेतील राज्यातील उत्पादनावर किंमती अवलंबून आहेत. टोमॅटोचे उत्पादन देशात जवळपास सर्वच राज्यात घेण्यात येते. पश्चिमी आणि दक्षिणेतील राज्यात टोमॅटोचे उत्पादन जास्त होते. या भागात जवळपास 56 ते 58 टक्के उत्पादन घेण्यात येते. याभागात उत्पादन वाढले आहे. त्याचा फायदा उत्तर भारताला होणार आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे योजना केंद्र सरकारने राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ म्हणजेच नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक संस्थेची त्यासाठी मदत घेण्यात येणार आहे. या दोन्ही संस्था सध्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि इतर राज्यातून टोमॅटोची खरेदी करतील आणि कमी किंमतीत ग्राहक विक्री केंद्रावरुन विक्री करण्याची योजना आखत आहेत. 14 जुलैपासून उत्तर भारतात हा प्रयोग सुरु होत आहे. कमी किंमतीत टोमॅटोची विक्री करण्यात येणार आहे.

लवकरच भावात घसरण देशातील इतर ठिकाणी पण टोमॅटोचे भाव उतरण्याची शक्यता आहे. गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील टोमॅटो बेल्टमधून मोठ्या प्रमाणात टोमॅटो उत्पादन होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सातारा, नारायणगाव, नाशिक आणि औरंगाबाद बेल्टमधून टोमॅटो उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. तर कर्नाटकातील कोलार पट्यातून टोमॅटोची आवक वाढणार आहे. आंध्र प्रदेशातील मदनपल्ले, चित्तूर येथे पण येत्या काही दिवसात नवीन पिक हाती येणार आहे. त्यामुळे भावात घसरण होण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.