HDFC Bank : शेअरधारकांना लागली लॉटरी! एचडीएफसी बँकेच्या विलिनीकरणाचा घडणार इतिहास

HDFC Bank : एचडीएफसी लिमिटेड आणि बँकेच्या विलिनीकरणाचा इतिहास घडत आहे. देशातील ही मोठी बाब आहे. त्याचा फायदा शेअरधारकांना पण होणार आहे. त्यांचे इतक्या शेअरचे गिफ्ट या व्यवहारातून मिळणार आहे.

HDFC Bank : शेअरधारकांना लागली लॉटरी! एचडीएफसी बँकेच्या विलिनीकरणाचा घडणार इतिहास
HDFC Merger
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 5:53 PM

नवी दिल्ली : गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसी लिमिटेड (HDFC Ltd) आणि खासगी क्षेत्रातील मोठी एचडीएफसी बँकेचे (HDFC Bank Merger) विलिनीकरण होत आहे. देशातील अशा प्रकारचे हे सर्वात मोठे विलिनीकरण आहे. 1 जुलै पासून दोन्ही संस्था एकत्र येतील. एचडीएफसीचे चेअरमन दीपक पारेख यांनी मंगळवारी याविषयीची माहिती दिली. विलिनीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या संचालकांची बैठक 30 जून रोजी होईल. अर्थात ही केवळ दोन संस्थामधील घडामोड नाही तर त्याचा बाजारावर व्यापक प्रभाव पडेल. दोन्ही संस्थांच्या शेअरधारकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. त्यांना इतक्या शेअर्सचे गिफ्ट मिळणार आहे.

हे शेअर डी लिस्टेड एचडीएफसीचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केकी मिस्त्री यांनी विलिनीकरणाच्या घडामोडींवर माहिती दिली. कंपनीच्या शेअर्सची सूचीबद्धता 13 जुलैपासून समाप्त होईल. हे शेअर डी लिस्टेड होतील. एचडीएफसी बँकेने गेल्या वर्षी 4 एप्रिल रोजी गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसी बँकेत विलिनीकरण करण्यास सहमती दर्शवली होती.

इतिहासातील मोठा व्यवहार दोन्ही मोठ्या संस्थांमधील हा व्यवहार 40 अब्ज डॉलरचा आहे. देशातील कंपन्यांच्या इतिहासातील हा सर्वात मोठा व्यवहार आहे. या विलिनीकरणानंतर वित्तीय सेवा देणारी देशातील एक मोठी कंपनी समोर येईल. या दोन्ही संस्थांमधील विलिनीकरणाची प्रक्रिया अभूतपूर्व आहे. या विलिनीकरणामुळे 168 अब्ज डॉलरची बँक उभी राहणार आहे. या विलिनीकरणाचा परिणाम देशातील लाखो ग्राहक आणि शेअर्सहोल्डर्सवर दिसून येईल. एचडीएफसी लिमिटेडच्या प्रत्येक शेअरधारकाला 25 शेअर्सच्या मोबदल्यात एचडीएफसी बँकेचे 42 शेअर्स मिळतील.

हे सुद्धा वाचा

शेअर्समध्ये तेजी या विलिनीकरणाचा एचडीएफसी लिमिटेडच्या शेअर धारकांना मोठा फायदा होईल. त्यांना एचडीएफसी बँकेचे 42 शेअर्स मिळतील. एचडीएफसी बँकेचे शेअर्स 740,000 हून अधिक शेअरधारकांना वाटप करण्यासाठी फार वेळ खर्ची पडू नये आणि प्रक्रिया त्वरीत व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या घडामोडींमुळे दोन्ही संस्थांमधील शेअर्समध्ये सध्या तेजीचे सत्र आहे. त्याचा फायदा गुंतवणूकदारांना झाला आहे. आता त्यातच त्यांना जादा शेअर्स पण मिळणार असल्याने ते मालामाल होतील.

असा झाला फायदा एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये गेल्या एका वर्षांत 22 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली. एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये दुपारी 2:55 बजे 1.50 टक्क्यांची उसळी आली. हा शेअर 1,660.05 रुपये पातळीवर ट्रेड करत आहे. तर एचडीएफसी लिमिटेडच्या शेअरमध्ये 1.63 टक्क्यांची तेजी आली. हा शेअर 2,764.75 रुपयांवर व्यापार करत आहे. या शेअरमध्ये एका वर्षांत 26 टक्क्यांची तेजी आली आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.