Share : शेअर उधार देऊन करा कमाई, विश्वास नाही? पोर्टफोलिओत पडून असलेल्या शेअरवर असे मिळेल व्याज..

Share : शेअर उधार देऊनही कमाई करते, कोणतीही आहे ही योजना..

Share : शेअर उधार देऊन करा कमाई, विश्वास नाही? पोर्टफोलिओत पडून असलेल्या शेअरवर असे मिळेल व्याज..
उधारीवर कमाईImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 10, 2022 | 8:28 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करण्यासाठी आता पंरपरागत गुंतवणूकदारही (Investors) पुढे येत आहेत. पंरतु, पुरेशा माहिती अभावी आणि योग्य मार्गदर्शन नसल्याने त्यांची बाजारातील सुरुवात निराशाजनक राहिली आहे. त्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. शेअर बाजारात एक समज असा आहे की, शेअर खरेदी केल्यानंतर त्याची किंमत वाढली तर तुम्हाला फायदा होईल.तर तुम्ही खरेदी केलेल्या भावापेक्षा शेअर (Stock) खाली आला तर नुकसान होईल. पण तुमचा शेअर घसरला आहे आणि तरीही तुम्हाला कमाई करता येईल, हे संभव आहे का?

सिक्युरिटी लेंडिंग अँड बॉरोईंग(Securities Lending And Borrowing) यामुळे हे साध्य होऊ शकते. तुम्ही खरेदी केलेला स्टॉक नकारात्मक निकाल देत असला, सातत्याने घसरणीवर असला तरी तुम्ही कमाई करु शकता.

सिक्युरिटी लेंडिंग अँड बॉरोईंग ही एक अशी व्यवस्था आहे की, शेअरचा मालक त्याच्याकडील शेअर उधारीत खरेदी करणाऱ्याला अस्थायी स्वरुपात हे शेअर देतो. त्याबदल्यात उधार शेअर घेणारी व्यक्ती त्याला काही रक्कम अथवा व्याज देते.

हे सुद्धा वाचा

SLB Stock हे उधार देणे अथवा घेण्यासंदर्भातील एका नियमानुसार कार्यरत असतात. 1997 साली सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) त्याची स्थापन केली होती. त्यानंतर 2012 मध्ये या नियमात सुधारणा करण्यात आली होती.

सेबीने योग्य विदेशी गुंतवणूकदारांना सोडून, इतर किरकोळ गुंतवणूकदारांना तसेच इतर वैध सहभागीदारांना एसएलबी प्लॅटफॉर्मचा उपयोग करण्यास मंजूरी दिली आहे. पण तुम्हाला हा व्यवहार थेट वैयक्तिक पातळीवर करता येत नाही. त्यासाठी मध्यस्थाची गरज लागते.

सध्या NCL (NSE Clearing Limited) आणि BOISL (BSE Clearing Corporation) हे दोन अधिकृत मध्यस्थ आहेत. त्यांच्यामार्फत तुम्हाला शेअर उधार देता येतात आणि घेता येतात. तुमच्या ब्रोकरकडे SLB खात्याची सुविधा आहे का, याची तुम्हाला माहिती घ्यावी लागेल.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.